अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. गेले काही दिवस तो पत्नी व भावाबरोबरच्या वादामुळे चर्चेत आहे. त्याच्या भाऊ शमास आलियाची बाजू घेत सातत्याने अभिनेत्यावर टीका करत आहे. त्याच्याविरोधात वक्तव्ये करत आहे. नवाज आणि त्याचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी यांच्यात सुरू असलेला वादही कोर्टात पोहोचला आहे. नवाज आणि शमसुद्दीनच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने दोन्ही भावांना स्पष्टपणे ते सोशल मीडियावर एकमेकांविरोधात कोणतीही टिप्पणी किंवा पोस्ट न करण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video: दिवंगत सतीश कौशिक यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी शेअर केले Unseen Photos; म्हणाले,”शशी आणि वंशिका…”

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याचा भाऊ शमसुद्दीन यांना सोशल मीडियावर एकमेकांविरुद्ध कोणतीही टिप्पणी पोस्ट न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोर्टाने शमसुद्दीनला नवाजच्या विरोधात केलेली अपमानास्पद पोस्टही काढून टाकण्यास सांगितले आहे.
नवाजुद्दीन-शमसुद्दीन यांना ३ मे रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार

न्यायमूर्ती आर.आय. छागला यांनी दोन्ही भावांना ३ मे रोजी त्यांच्या वकिलांसह त्यांच्या चेंबरमध्ये उपस्थित राहून त्यांच्यातील वाद मिटवण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले. नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याची पत्नी आलिया आणि भावाविरुद्ध दाखल केलेल्या १०० कोटींच्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

हेही वाचा- शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, आगामी चित्रपटाबद्दल समोर आली मोठी माहिती

काय म्हणाले शमसुद्दीनचे वकील?

शमसुद्दीनचे वकील रुमी मिर्झा आणि कौशल ठक्कर यांनी न्यायालयाला सांगितले की, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या हस्तक्षेपामुळे सिद्दीकी आणि त्याची माजी पत्नी आलिया यांच्यात तडजोडीची चर्चा सुरू आहे. तसेच दोन्ही भावांनीही तडजोड करावी असे आवाहन त्यांनी केले.
नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील अभिनव चंद्रचूड आणि सुनील कुमार म्हणाले की, शमसुद्दीनने बदनामीकारक पोस्ट हटवल्यानंतरच भावांमध्ये संवाद सुरू होऊ शकतो.

हेही वाचा- “मी आरशात पाहिलं अन्…” त्वचेच्या रंगात झालेल्या बदलावर काजोलचे स्पष्टीकरण

काय आहे नवाजुद्दीनवर आरोप?

नवाजुद्दीने १००० कोटी रुपयांच्या नुकसानाची मागणी करत भाऊ व पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नवाजुद्दीनच्या भावाने धक्कादायक खुलासे केले आहेत. “नवाजुद्दीनने तीन लग्न केले आहेत. एक लग्न त्याने लॉकडाऊन असताना इशाबरोबर केलं. हल्दवानी (उत्तराखंड) येथे राहणारी फिरोजा ही त्याची पहिली पत्नी आहे. नवाजुद्दीने त्याची वहिनी गरोदर असताना तिला लाथ मारली”. असे आरोप नवाजुद्दीनच्या भावाने केले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court orders nawazuddin siddiqui and his brother shamsuddin siddiqui to dont post against each other on social media dpj
Show comments