Boney Kapoor Financial Losses : २०२४ मध्ये आलेला ‘मैदान’ हा चित्रपट फ्लॉप झाला. बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती, यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. याआधीही बोनी कपूर यांनी अनेक आर्थिक आव्हानांना तोंड दिलं आहे. त्यांच्यावर सर्वात मोठं आर्थिक संकट १९९३ साली ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाच्या अपयशामुळे आलं. जवळपास १० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट त्या काळातील सर्वात महागडा हिंदी चित्रपट ठरला. इतक्या मोठ्या खर्चानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि बोनी कपूर यांच्यावर वितरकांचं मोठं कर्ज झालं.

‘मिस्टर इंडिया’चा यशस्वी प्रयोग आणि ‘रूप की रानी चोरों का राजा’ची तयारी

‘रूप की रानी चोरों का राजा’ (Roop Ki Rani Choron Ka Raja) पूर्वी बोनी कपूर यांनी १९८७ साली ‘मिस्टर इंडिया’ या यशस्वी चित्रपटाची निर्मिती केली होती. शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांनी दिग्दर्शित केलेला आणि अनिल कपूर (Anil Kapoor) व श्रीदेवी (Sridevi) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या उद्देशाने, बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’साठी अनिल कपूर व श्रीदेवी यांची मुख्य भूमिकेसाठी निवड केली. शेखर कपूर यांना पुन्हा दिग्दर्शनाची जबाबदारी दिली, तसेच संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल, छायाचित्रकार बाबा आझमी आणि पटकथालेखक जावेद अख्तर या दिग्गजांना सिनेमात घेतलं. चित्रपटाची स्टार पॉवर वाढवण्यासाठी जॅकी श्रॉफलाही महत्त्वाच्या भूमिकेत घेतलं.

Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

हेही वाचा…खुशी कपूरने स्वत: दिली प्रेमाची कबुली; बॉयफ्रेंडचं नाव लिहिलेला ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दिग्दर्शक बदलाचा फटका आणि वाढलेला खर्च

चित्रपटासाठी एक अत्यंत उत्कृष्ट टीम तयार करण्यात आली होती, पण एक मोठा अडथळा आला – शेखर कपूर यांनी अर्ध्यातून हा चित्रपट सोडला. त्यानंतर बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी सतीश कौशिक (Satish Kaushik)यांची या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून निवड केली. दिग्दर्शक बदलल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगला विलंब झाला, महागडे सेट्स महिनो न महिने न वापरल्याने खर्चाचा बोजा वाढला आणि चित्रपटाचं बजेट वाढलं.

कमकुवत कथानक आणि प्रेक्षकांचा नकार

बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी चित्रपटाच्या सेट्स, अॅक्शन सीन्स आणि आकर्षक दृश्यांवर भरपूर खर्च केला; पण त्यांचं चित्रपटाच्या कथानकाकडे दुर्लक्ष झालं. चित्रपटात अनावश्यक गाण्यांचा समावेश करून कथेतील उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा सिनेमाच्या दर्जावर नकारात्मक परिणाम झाला. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची लोकप्रिय जोडी असूनही चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

हेही वाचा…“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…

कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाचा आधार

एका मुलाखतीत अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) सांगितलं की, ‘रूप की रानी चोरों का राजा’च्या अपयशानंतर बोनी कपूर यांना वितरकांचं कर्ज फेडण्यासाठी चार वर्षं लागली. “त्यांनी आजवर अनेक संकटांचा सामना केला असून त्यातून ते पुन्हा उभे राहिले आहेत,” असं अर्जुन कपूरने सांगितलं.

हेही वाचा…Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ

बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत या आर्थिक संकटाच्या काळात त्यांच्या कुटुंबाचं महत्त्वही अधोरेखित केलं. त्यांच्या पत्नी मोना कपूर आणि भावंडं अनिल व संजय कपूर यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. “माझ्या पत्नीने प्रत्येक संकटात मला आधार दिला; तिने सिद्धिविनायक मंदिरापर्यंत अनवाणी पायांनी जात प्रार्थना केली होती. माझी भावंडं नेहमीच माझ्याबरोबर होती,” असं भावनिकपणे त्यांनी सांगितलं.

Story img Loader