दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या बॉलीवूडच्या ‘चांदनी’ म्हणून ओळखल्या जातात. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईत त्यांचं निधन झालं. भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी त्या दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवी यांच्या निधनासंदर्भात त्यांचे पती बोनी कपूर यांनी अलीकडेच ‘द न्यू इंडियन’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीच्या निधनानंतर दुबईत बोनी कपूर यांना कशी वागणूक दिली गेली याबाबतही त्यांनी या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

हेही वाचा : Video : “तुम्ही सर्वांनी मोदक खाल्ले?”, श्रद्धा कपूरचा पापाराझींबरोबर मराठीतून संवाद, नेटकरी म्हणाले…

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”

बोनी कपूर म्हणाले, “तिचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तिचा अपघाती मृत्यू झाला होता. जवळपास २४ ते ४८ तास माझी चौकशी सुरु होती. भारतीय मीडियाचा दबाव असल्याने आम्हाला एवढावेळ चौकशी करावी लागत असल्याचं तेथील अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. मला त्यांच्या चौकशीला सामोरं जाताना कसलीच अडचण आली नाही कारण, मी प्रामाणिक होतो.”

हेही वाचा : “पाकिस्तानमधील प्रयोग, दहशतवादी हल्ला अन्…”, ‘ताली’ फेम सुव्रत जोशीच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला…

बोनी कपूर पुढे म्हणाले, “माझी लाय डिटेक्टर आणि इतर अनेक चाचण्या करण्यात आल्या. संपूर्ण तपास आणि चाचण्यांच्या अहवालात हा अपघाती मृत्यू असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. मला तिच्या जाण्याचं प्रचंड दु:ख होतं. परंतु, तिच्या निधनानंतर घडलेल्या गोष्टी योग्य नव्हत्या. त्याचा सर्वाधिक परिणाम माझ्यावर झाला.”

हेही वाचा : “मराठी लोकांमध्ये हावरटपणा नव्हता”, जितेंद्र यांनी केलं कौतुक; म्हणाले, “तेव्हा लबाड…”

“श्रीदेवी प्रचंड कठीण डाएट फॉलो करायची. निधन झालं त्यादिवशी सुद्धा तिचं डाएट सुरु होतं. अनेकवेळा ती काहीच खायची नाही. पडद्यावर सुंदर दिसावं ही तिची कायम इच्छा असायची. माझ्याशी लग्न झाल्यावर अनेकदा तिला ब्लॅकआउट्सचा त्रास झाल्याचं मी पाहिलं होतं. डॉक्टरांनी तिला कमी रक्तदाबाचा त्रास असल्याचंही सांगितलं होतं. जेवणात मीठ खाल्लं पाहिजे असा सल्ला नेहमी तिला डॉक्टर द्यायचे परंतु, डाएटमुळे अनेकदा ती अळणी पदार्थ खायची. दुर्दैवाने, तिने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि एवढी मोठी दुर्घटना घडली.” असं बोनी कपूर यांनी सांगितलं.

Story img Loader