बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही कारणाने चर्चेत असते. जान्हवीने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं आणि त्यानंतर तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मागच्या काही काळापासून जान्हवी लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं बोललं जात होतं. आता यावर जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जान्हवी कपूर लवकरच तमिळ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहेत. पण आता यामागचं सत्य जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी सांगितलं आहे. बोनी कपूर यांनी एक ट्वीट करत जान्हवीच्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पदार्पणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आणखी वाचा- जान्हवी कपूर पुन्हा करतेय महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट? व्हिडीओ व्हायरल

बोनी कपूर यांनी जान्हवीच्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पदार्पणावर प्रतिक्रिया देताना आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “प्रिय मीडिया मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जान्हवीने अद्याप कोणताही तमिळ चित्रपट साइन केलेला नाही. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तिच्या दाक्षिणात्य पदार्पणबद्दल कोणत्याही प्रकारची अफवा किंवा खोटी माहिती पसरवली जाऊ नये.”

दरम्यान काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत जान्हवीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, “माझ्याकडे आता ‘बवाल’ हा चित्रपट आहे जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे आणि मी आशा करते की लवकरच मी दाक्षिणात्य चित्रपटातही काम करेन.” जान्हवीच्या याच वक्तव्यानंतर तिच्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पदार्पणाची चर्चा सुरू झाली होती.