जान्हवी कपूर, खुशी कपूर, अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर यांचे वडील व प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी मुलांच्या रिलेशनशिपबद्दल मत मांडलं आहे. आपण कधीच मुलांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करत नाही, पण काही वेळा मुलांच्या नात्यातील काही परिस्थितींबाबत आपण नाराजी व्यक्त केली आहे, असं ते म्हणाले.

आपल्या मुलांनी डेट करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तींबद्दल मी कधीच त्यांच्याशी बोललो नाही, असं ‘न्यूज १८’ शी बोलताना बोनी कपूर म्हणाले. “अशी वेळ कधीच आली नाही की मला त्यांना काहीतरी सांगावं लागलं. मला अर्जुन, जान्हवी आणि खुशीच्या नात्यांमधील काही गोष्टी आवडल्या नाहीत, त्याबाबत मी नाराजी व्यक्त केली आहे, मी त्यांना त्या गोष्टी नीट हाताळण्यास सांगितलं आहे,” असं बोनी कपूर म्हणाले.

ranveer allahbadia on indias got latent video
स्पर्धकाच्या आई-वडिलांच्या प्रायव्हसीवर अश्लील वक्तव्य; रणवीर अलाहाबादियावर लोकांचा संताप, म्हणाले, “विकृत…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Bollywood actress Kareena Kapoor shared a cryptic post
“लग्न, घटस्फोट, चिंता अन्…”, करीना कपूरने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली…
khushi kapoor junaid khan
“अनेक विचित्र गोष्टी…”, खुशी कपूर आणि जुनैद खान एआयच्या गैरवापरावर झाले व्यक्त; म्हणाले, “लोकांनी स्वत:ला…”
Khushi Kapoor
खुशी कपूरने कधी रिक्षाने प्रवास केलाय का? उत्तर देत म्हणाली, “आई-बाबांचा विरोध…”
Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
Khushi Kapoor
“माझा आत्मविश्वास…”, खुशी कपूरची तिच्या सौंदर्यावरून उडवली जात होती खिल्ली; किस्सा सांगत म्हणाली…
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”

‘पक पक पकाक’ मधली ‘साळू’ सध्या काय करते, कशी दिसते? जाणून घ्या

अर्जुन कपूर २०१८ पासून मलायका अरोराला डेट करत आहे. तर जान्हवी शिखर पहारियाला डेट करत आहे. दोघांनी ब्रेकअप केलं होतं, पण नंतर ते पुन्हा एकत्र आले. तर, अंशुला पटकथा लेखक रोहन ठक्करबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. सर्वात धाकटी खुशी तिचा सहकलाकार वेदांग रैना याला डेट करत असल्याची चर्चा आहे.

पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

मुलांनी आपली नाती स्वतःच हाताळावी, असं बोनी कपूर यांना वाटतं. “ते समजदार आहेत, त्यांना स्वतःचे विचार आहेत. आमच्या काळात असतं नव्हतं. जग कसं चालतं हे समजून घेण्यासाठी आम्ही वेळ घ्यायचो, पण आताच्या पिढीसाठी मतं बनवणं सोपं आहे,” असं बोनी म्हणाले. जान्हवी आणि खुशी या बोनी आणि श्रीदेवी यांच्या मुली आहेत, तर अर्जुन आणि अंशुला हे दोघे बोनी यांची पहिली पत्नी मोना शौरी कपूर यांची अपत्ये आहेत.

“काकू मला…”, बाळाबद्दल विचारणाऱ्या महिलेला प्रिया बापटने दिलेलं उत्तर; लग्नाला झालीयेत १३ वर्षे

२०१८ मध्ये श्रीदेवींचं निधन झाल्यावर अर्जुन, अंशुला व जान्हवी-खुशी ही चारही भावंडं एकमेकांच्या जवळ आली. ही भावंडं सण-उत्सव एकत्र साजरे करतात. इतकंच नाही तर ते एकत्र फिरायलाही जातात. या चौघांना एकत्र पाहून खूप चांगलं वाटतं. आम्ही सगळे एकत्र खूप आनंदी असतो, माझी मुलंच माझं जग आहेत, असं बोनी कपूर म्हणाले.

Story img Loader