जान्हवी कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षभरापासून अभिनेत्री शिखर पहारियाला डेट करत असल्याच्या चर्चा चालू होत्या. यानंतर जान्हवीने ‘कॉफी विथ करण’मध्ये शिखर आणि तिच्या नात्याबाबत भाष्य केलं होतं. याशिवाय अभिनेत्रीने नुकतंय शिखर पहारिया आणि तिचा जवळचा मित्र ओरी यांच्याबरोबर तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. त्यामुळे बोनी कपूर यांची लाडकी लेक लवकरच शिखरबरोबर संसार थाटणार असल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत. यावर स्वत: आता बोनी कपूर यांनी स्पष्टीकरण देत जान्हवी-शिखरच्या नात्यावर सूचक विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोनी कपूर यांनी नुकत्याच ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी आणि शिखर यांचं नातं आयुष्यभर टिकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “शिखर खूप गोड मुलगा आहे. जान्हवी त्याला ओळखत सुद्धा नव्हती तेव्हापासून आम्ही दोघं मित्र आहोत. मला विश्वास आहे की, तो जान्हवीला कधीच सोडून जाणार नाही. शिखर नेहमीच आमच्या कुटुंबाच्या जवळ असतो. संपूर्ण कपूर कुटुंबीयांबरोबर त्यांचं खूप सुंदर बॉण्डिंग आहे. जेव्हा त्यांच्यात गोष्टी नीट नव्हत्या तेव्हा सुद्धा शिखर कायम आमच्याबरोबर होता.”

हेही वाचा : “माझी बहीण कधीच…”, गौतमी देशपांडेची मृण्मयीसाठी मजेशीर पोस्ट, आलिया भट्टचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

“शिखर नेहमी जान्हवी, माझ्या आणि अर्जुनच्या मदतीसाठी पुढे येतो. आम्ही खरंच भाग्यवान आहोत.” असं बोनी कपूर यांनी सांगितलं. दरम्यान, शिखर पहारियाबद्दल सांगायचं झालं, तर तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची पत्नी आहे मराठी; गुजराती कुटुंबात गेल्यावर सासूबाईंनी दिली खंबीर साथ; श्रद्धाने सांगितला किस्सा

सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे पहारिया यांचा शिखर मोठा मुलगा आहे. शिखरच्या लहान भावाचं नाव वीर असून तो लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी आणि शिखर अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त एकत्र तिरुपतीच्या दर्शनाला गेले होते. याशिवाय अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुद्धा शिखर जान्हवीबरोबर उपस्थित होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boney kapoor reveals shikhar pahariya will never be janhvi ex in recent interview sva 00