प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर(Boney Kapoor) हे अभिनेता अर्जुन कपूर, खूशी कपूर व जान्हवी कपूरचे वडील आहेत. विविध कारणांमुळे ते सातत्याने चर्चेत असल्याचे दिसते. स्वत:चे वजन कमी केल्यामुळे ते चर्चेत होते. नुकतेच त्यांनी केस ट्रान्सप्लान्ट केले आहेत. आता त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत यामागची प्रेरणा त्यांची पत्नी दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी(Sridevi) असल्याचे म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे मी वजन कमी केले

बोनी कपूर यांनी नुकताच एबीपी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले, “माझ्या पत्नीने मला काय सांगितले होते याची मला आठवण झाली. तिने मला सांगितले होते की, जर तुम्हाला तुमच्या केसांबाबत काही करायचे असले तर त्याआधी तुम्ही वजन कमी करा, त्यामुळे मी वजन कमी केले.” पुढे ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटात काम करताना बोनी कपूर यांनी जेव्हा स्वत:ला मॉनिटरवर पाहिले, त्यावेळी वजन कमी करण्यासाठी प्रेरणा मिळाली, असे त्यांनी म्हटले आहे. याबद्दल अधिक बोलताना त्यांनी म्हटले, “‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटावेळी जेव्हा मी स्वत:ला मॉनिटरवर पाहायचो, त्यावेळी मला वाटायचे की या फ्रेममध्ये माझ्याशिवाय सर्वकाही ठीक आहे. मी त्या फ्रेममध्ये लालाजीसारखा दिसत होतो. मला लालाजीच्या लूकमधून स्वत:ला बाजूला करायचे होते”, असे म्हणत वजन कमी करण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली यावर त्यांनी भाष्य केले आहे.

लोकप्रिय दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व बोनी कपूर यांच्याबद्दल बोलायचे तर ते चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. बोनी कपूर पहिल्या भेटीतच श्रीदेवींच्या प्रेमात पडले होते. श्रीदेवी या नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. १९९६ ला त्यांनी लग्नगाठ बांधली. २०१८ ला श्रीदेवींचे निधन झाले. मात्र, त्यांच्या निधनानंतरही श्रीदेवींच्या विचारांनी बोनी कपूर प्रेरित असल्याचे दिसते.

हेही वाचा: “कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”

बोनी कपूर यांनी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांबद्दल बोलताना म्हटले, “माझ्यात झालेले हे बदल श्रीदेवीच्या आठवणींना श्रद्धांजली आहे. कोणताही सकारात्मक बदल करण्यासाठी उशीर झालेला नसतो, याची ही आठवण आहे. श्रीदेवीचे शब्द वजन कमी करण्याच्या संपूर्ण प्रवासात प्रेरणा देणारे, प्रोत्साहन देणारे ठरले. ती म्हणत असे की जेव्हा मी तुला भेटले होते, त्यावेळी तू बारीक, उंच होतास व छान दिसत असे. त्यावर मी श्रीदेवीला म्हणत असे की, तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला आणखी काय हवे होते? जर मी बारीक झालो तर इतर महिला माझ्याकडे आकर्षित होतील आणि मला तसे होऊ द्यायचे नाही. त्यावर ती हो हो असे म्हणत असे”, अशी आठवण बोनी कपूर यांनी सांगितली आहे. याबरोबरच माझ्या आरोग्यासाठी पत्नी श्रीदेवी वजन कमी करण्यासाठी सांगत असे, असेही बोनी कपूर यांनी म्हटले आहे.