प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंतचे कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, या कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरली ती अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीद. कार्यक्रमात परफॉर्म करताना अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीद हिला उचलून तिला गालावर किस केल्यामुळे बॉलिवूड अभिनेता वरुण धवन चांगलाच ट्रोल झाला होता. आता गीगीचा आणखी एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा- ‘भोला’च्या कमाईवरुन अभिनेत्याने उडवली अजय देवगणची खिल्ली, म्हणाला, “संपूर्ण बॉलिवूडला…”
वरुणचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आणि त्याने गिगीची परवानगी न घेताच तिला किस केलं हे नेटकऱ्यांना खटकलं आणि त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. प्रकरण वाढतं पाहून वरुण याबाबत स्पष्टीकण दिलं आहे. आता गीगीचा बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांच्याबरोबरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटो बोनी कपूर यांनी गिगीच्या कमरेवर हात ठेवला आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी आपला मोर्चा बोनी कपूर यांच्याकडे वळवला असून त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा- अयान मुखर्जीने दिलं आणखी एक सरप्राइज; हृतिक रोशनच्या ‘या’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सांभाळणार धुरा
नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळ्याला आलेल्या गिगी हदीदने कार्यक्रमादरम्यान बोनी कपूर यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायर झाले आहेत. या फोटोत बोनी कपूर गिगीच्या कमेवर हात ठेवलेले दिसत आहेत. मात्र, नेटकऱ्यांना हा फोटो पसंत पडलेला दिसत नाहीये.
बोनी कपूर यांनी गिगीला चूकीच्या पद्धतीने स्पर्श केला असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. तर काहींच्या मते बोनी कपूर यांनी गिगीच्या कमरेवर अशा प्रकारचा हात ठेवायला नको होता. एका युजरने लिहले आहे मुलाला मोठी बाई आवडते आणि वडिलांना छोटी. दुसर्या यूजरने लिहिले, काका तुमचे हात काढा. काहींनी बोनी कपूर यांना ठर्की म्हातारा म्हणत निशाणा साधला आहे. तर काहींनी शरीर म्हातारे झाले पण मन अजून तरुण आहे म्हणत टोला लगावला आहे.
या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिचा भाऊ आर्यन खानसोबत मीडियासाठी पोज देताना दिसत आहे. ज्यामध्ये आर्यनने सुहानापासून काही अंतरावर आदरपूर्वक हात ठेवला होता. या प्रकारानंतर आर्यनचे सोशल मीडियावर खूप कौतुक करण्यात येत आहे.