अभिनेत्री मृणाल ठाकुरने टीव्ही मालिकांमध्ये काम केलं, त्यानंतर तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये काम मिळवलं. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मृणाल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या एका रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; अभिनेत्रीच्या अंडरगारमेंटमध्ये आढळले स्पर्म

‘रणवीप अहलाबादिया’शी बोलताना झालेल्या मृणालने तिच्या एक्स बॉयफ्रेंडशी झालेल्या ब्रेकअपबद्दल सांगितलं होतं. मृणाल म्हणाली होती, “तो पळून गेला होता. तो म्हणायचा ‘तू खूप इम्पल्सिव्ह आहेस, मी याचा सामना करू शकत नाही, तू एक अभिनेत्री आहेस, याचाही सामना मी करू शकत नाही.’ खरं तर मला माहीत होतं की तो खूप पुराणमतवादी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आला आहे. त्यामुळे मी त्याला दोष देत नाही, मला वाटतं की त्याच्या संगोपनामुळे तो असं वागायचा. एकाअर्थी ते नातं संपलं ते चांगलंच झालं, कारण भविष्यात जेव्हा माझ्या मुलांचं पालनपोषण आणि संगोपन सारखं झालं नसतं, तर तेव्हा आपल्यासोबत नक्की काय घडतंय, असा प्रश्न मुलांना पडला असता,” असं तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं.

‘पूजा मेरी जान’, ‘पिप्पा’, ‘आँख मिचोली’, ‘नानी ३०’ हे मृणालचे आगामी चित्रपट आहेत. सध्या ती चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर, ती अखेरची ‘सीता रामम’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होती. तिची दुल्कर सलमानबरोबरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyfriend left mrunal thakur after she became actress hrc