कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषण प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून क्लीन चीट मिळाली आहे. त्यांच्याविरोधात सात मल्लांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. गेल्या एक महिन्यापासून कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणात दोन न्यायालयांमध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली होती. त्यापैकी पटियाला हाऊस कोर्टात अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीसंदर्भातला क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यात अल्पवयीन महिला कुस्तीपटूचं लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही. त्यामुळे POCSO अंतर्गत कुठलेही आरोप लावता येणार नाहीत असं दिल्ली पोलिसांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवूड अभिनेता व चित्रपट समीक्षक कमल आर खानने(केआरके) ट्वीट केलं आहे.

हेही वाचा>> “भाजपा जगातील सगळ्यात मोठा पक्ष”, राजकारणात एन्ट्री केलेल्या मेघा धाडेचं वक्तव्य, म्हणाली, “फक्त हिरोइनसारखं…”

“तीन वर्षांपूर्वी भेटलेल्या निर्मात्याच्या विरोधात एका मुलीने गुन्हा दाखल केला होता. मुलीचा हात पकडून त्या निर्मात्याने शरीरसंबंधाची मागणी केली होती. त्या मुलीकडे त्याचा नंबर नव्हता. मेसेज किंवा कोणताही पुरावा नव्हता. तरीही पोलिसांनी त्याला अटक केली. एवढ्या कुस्तीपटू एका राजकीय नेत्यावर आरोप करत आहेत, पण पोलीस त्याला अटक करू शकत नाहीत. भारतात आज असा कायदा आहे,” असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> आशिष विद्यार्थी यांनी पहिल्यांदाच शेअर केला दुसऱ्या पत्नीबरोबरचा फोटो, म्हणाले…

सात महिला कुस्तीगीरांनी २१ एप्रिल २०२३ रोजी दिल्ली पोलिसात बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषण प्रकरणात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी २८ एप्रिलला बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दोन प्रकरणं नोंदवली होती. पहिलं प्रकरण ६ कुस्तीगीर महिलांच्या लैंगिक शोषणाचं होतं. तर दुसरं प्रकरण एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाचं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brijbhushan singh gets clean cheet by delhi police in minor wrestlers sexual abuse krk tweet kak