सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सतीश यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय कोलमडून गेले आहेत. असं असताना त्यांच्या मृत्यू प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. सतीश यांची हत्या विकासने केली असल्याचं व्यासायिकाची पत्नी सान्वी मालू म्हणत आहे.

आणखी वाचा – “१५ कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली” पत्नीच्या आरोपावर व्यावसायिकाचं उत्तर, म्हणाला, “होळी पार्टीच्या…”

सान्वी आपल्या पतीवर सातत्याने आरोप करत आहे. दरम्यान ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सान्वीने नवीन गंभीर आरोप विकासवर केले आहेत. सान्वी म्हणाली, “ऑगस्ट २०२२मध्ये माझे पती व सतीश यांच्यामध्ये वाद झाला. विकासला दिलेले १५ कोटी रुपये सतीश परत मागत होते. भारतात आल्यानंतर मी तुमचे पैसे परत करेन असं माझ्या पतीने सतीश यांना सांगितलं”.

आणखी वाचा – Video : सतीश कौशिक यांच्या निधनानंतर कोलकाताच्या कालीघाट मंदिरामध्ये पोहोचले अनुपम खेर, म्हणाले, “माझ्या मित्राच्या…”

“करोना काळामध्ये पैशाचं नुकसान झाल्यामुळे सतीश यांचे १५ कोटी परत करण्याचा त्यांचा कोणताच उद्देश नव्हता. सतीश यांची हत्या करण्यासाठी मी ब्ल्यू पील्स (व्हायग्रा) व रशियन मुलींचा वापर करणार असल्याचंही विकास यांनी मला सांगितलं होतं”. सान्वीने या प्रकरणामध्ये नवा खुलासा केला आहे.

आणखी वाचा – “१५ कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली” म्हणणाऱ्या व्यावसायिकाच्या पत्नीला शशी कौशिक यांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “निधनानंतरही…”

दरम्यान सतीश यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. तसेच या प्रकरणात पोलीस तपास व्हावा अशीही शशी यांची इच्छा नाही. तर दुसरीकडे विकास मालूने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे सतीश यांचा होळी पार्टीमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे. सतीश व त्याची ३० वर्षांपासून मैत्री असल्याचं त्याने हा व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं. शिवाय सतत करण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचंही विकासचं म्हणणं आहे.

Story img Loader