सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पण सतीश यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस तपास करत आहेत. सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. यादरम्यान विकासच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सतीश यांची हत्या विकासने केली असल्याची तक्रार व्यावसायिकाच्या पत्नीने पोलिसांमध्ये दाखल केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर विकासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा सगळ्या प्रकरणाबाबत मौन सोडलं आहे. विकासने होळी पार्टीदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सतीश मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर विकासने त्याची बाजू मांडली आहे.

विकास म्हणाला, “गेल्या ३० वर्षांपासून सतीश व माझी मैत्री आहे. जगाला माझ्या नावाचा चुकीचा वापर करण्यासाठी एक मिनिटाचाही कालावधी लागला नाही. होळी पार्टीच्या काही तासांनंतर जे काही घडलं त्यामधून आम्ही अजूनही बाहेर पडलो नाही. या प्रकरणाबाबत मी आता बोलू इच्छित आहे”.

आणखी वाचा – ३८ वर्षांचा संसार, १० वर्षांची मुलगी अन्…; सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अशी झाली आहे पत्नीची अवस्था

“एखादी घटना ही कोणतीही पूर्व कल्पना नसताना घडते. अशावेळी कोणीच काही करू शकत नाही. प्रत्येकाच्या भावनांचा आदर करा अशी मी प्रसारमाध्यमांना विनंती करत आहे. येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये सतीश यांची आठवण येत राहील”. विकास मालूच्या पत्नीने पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. विकासने काही वर्षांपूर्वी सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते. त्याच्याकडे १५ कोटी रुपये परत करण्यासाठी पैसेच नव्हते आणि या वादामधूनच विकासने सतीश यांची हत्या केली असल्याची तक्रार व्यावसायिकेच्या पत्नीने केली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman vikas mallu statement on satish kaushik death and friendship share actor holi party video kmd