Cannes Film Festival 2023 : जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. फ्रान्समधील या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सिनेसृष्टीतील विविध कलाकारांसह दिग्गज व्यक्तिमत्त्व हजेरी लावताना दिसतात. याच कान्स महोत्सवादरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा लूक चर्चेत आला आहे. उर्वशी रौतेलाने निळ्या रंगाच्या लिपस्टिकमुळे तिला ट्रोल केले जात आहे.
उर्वशी रौतेलाने नुकतंच कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली. नुकतंच तिने तिच्या लूकचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. याबरोबरच याच लूकचे काही व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “एकनाथ शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…” मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “चार हात, दोन फोन, एक नाथ…”
यावेळी उर्वशीने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. त्याबरोबर तिने डायमंडचा नेकलेस आणि मॅचिंग एअररिंग्सही घातले होते. याबरोबर तिने या लूकला साजेसा असा मेकअपही केला होता. मात्र यावेळी तिने लावलेल्या लिपस्टिकच्या रंगामुळे ती चर्चेत आली आहे.
उर्वशीने या ड्रेसवर निळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. या लिपस्टिकमुळे ती चर्चेत आली आहे. उर्वशीच्या या लूकची तुलना अनेकांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकशी केली आहे. तिच्या या लूकवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. “डोरेमॉनची बहिण वाटतेय”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर “ऋषभ पंतच्या नादाला लागून ही काय अवस्था करुन घेतलीस”, अशी कमेंट एकाने केली आहे. “कोणी कार्टूनमध्येही घेणार नाहीत”, असे एकाने म्हटले आहे.

या कान्स फेस्टिवलमधील एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही फोटोग्राफर्स तिला ऐश्वर्या म्हणून आवाज देताना दिसत आहे. ऐश्वर्याचे नाव ऐकल्यानंतर उर्वशीही मागे वळत हसल्याचे दिसत आहे.