Virat Kohli should not join films: भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा खेळाडू विराट कोहलीने आतापर्यंत बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केलं आहे, पण त्याने कधीच एखाद्या चित्रपटात, शोमध्ये किंवा वेब सीरिजमध्ये अभिनय केलेला नाही. विराट कोहली हा उत्तम अभिनेता आहे, पण त्याने चित्रपटांमध्ये येऊ नये असं वक्तव्य लोकप्रिय कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा याने केलं आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याने चित्रपटांपासून दूर राहावं, असंही तो म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराटने अभिनयक्षेत्रात येऊ नये, असं का वाटतं त्यामागचं कारणही मुकेशने सांगितलं. रणवीर अलाहाबदियाला दिलेल्या मुलाखतीत मुकेश म्हणाला, “विराट कोहली एक उत्तम अभिनेता आहे. तो दिल्लीचा आहे, तो पंजाबी आहे. त्याने आयुष्यात खूप गोष्टी पाहिल्या आहेत. त्याने त्याचं यश खूप सुंदरपणे हाताळलं आहे. स्पर्धा, लूक, फिटनेस, मानसिक आरोग्य अशा प्रत्येक बाबीत त्याने स्वत:ला खूप सांभाळलं आहे. त्याला छोले भटुरे खूप आवडतात आणि तो एक उत्तम माणूस आहे.”

फोटो काढायला आलेल्या चाहतीचा हात झटकून हेमा मालिनी म्हणाल्या असं काही की…; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

विराट हा एक चांगला पती आणि बाबा आहे, असंही मुकेश म्हणाला. “मी त्याला ५-६ वर्षांपूर्वी एका पार्टीत भेटलो होतो, आज तो सर्वांसाठी आदर्श आहे,” असं मुकेश म्हणाला. विराटने क्रिकेटपटूंच्या एका पिढीला प्रेरणा दिली आहे, असंही त्याने नमूद केलं.

विराट कोहली (फोटो – इन्स्टाग्राम)

“तो खूप मजेदार आहे. तो डान्स करू शकतो, त्याचे कॉमिक टायमिंग खूप चांगले आहे. देशाला अभिमान वाटावा यासाठी तो खूप चांगलं काम करत आहे. तरीही तो जिथे आहे तिथेच त्याने राहावं आणि चित्रपटांमध्ये येऊ नये. क्रिकेट करिअरमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याने चित्रपटांमध्ये येऊ नये. तो खरंच खूप हुशार माणूस आहे, लबाड नाही,” असं मुकेश म्हणाला.

सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध

दरम्यान, यापूर्वी अनेक क्रिकेटपटू अभिनय करताना दिसले आहेत. अजय जडेजा, हरभजन सिंग, श्रीशांत यांसारख्या क्रिकेटपटूंनी काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विराट कोहली अभिनयक्षेत्रात नसला तरी त्याची पत्नी अनुष्का बॉलीवूड अभिनेत्री असल्याने त्याचा या क्षेत्राशी जवळचा संबंध आहे.

कुठे आहे ‘मोहरा’तील ही अभिनेत्री? १८ वर्षांनी साध्वीच्या रुपात दिसली अन्…; आता करते ‘हे’ काम

विराटने अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केलंय, खास गोष्ट अशी की या दोघांची पहिली भेट एका जाहिरातीच्या निमित्ताने सेटवर झाली होती. २०१८ मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यापूर्वी त्यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. विराट व अनुष्का यांना आता मुलगी वामिका आणि मुलगा अकाय ही दोन अपत्ये आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Casting director mukesh chhabra says virat kohli is great actor but he should not join films hrc