अभिनेता अक्षय कुमारचे ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ यांसारखे काही चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित झाले. त्याचे अलिकडेच प्रदर्शित झालेले हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र सुपरफ्लॉप ठरले. सुपरफ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. खिलाडी कुमारचा ‘राम सेतु’ येत्या दिवाळीला सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. अशातच ‘राम सेतु’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून काही काही बदल सुचवण्यात आले आहेत.

आणखी वाचा : जान्हवी कपूरने खुशीला दिला मोलाचा सल्ला; म्हणाली, “कधीच कोणत्या अभिनेत्याला डेट करू नको, कारण…”

‘राम सेतु’ या चित्रपटाचे सेन्सॉर बोर्डाने नुकतेच परिक्षण केले. त्यांनी या चित्रपटाला U/A सर्टिफिकेट दिले आहे. त्याचबरोबर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील कोणताही सीन डिलीट केलेला नाही. मात्र ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार या चित्रपटातील काही संवादांमध्ये ‘राम’ असा उल्लेख होता. सेन्सॉर बोर्डाने तो उल्लेख ‘श्रीराम’ असा करण्यास सांगितला आहे. तसेच ‘बुद्ध’ यांच्या नावाचा उल्लेखही ‘भगवान बुद्ध’ असा करण्यास चित्रपटाच्या निर्मात्यांना सांगण्यात आले आहे.

याबरोबरच या चित्रपटतील काही संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. “श्रीराम कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले होते?” हे वाक्य बदलून “हे सगळे कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवले जाते?” असे वाक्य घेण्यास सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे.

याचबरोबर फायरिंग सीनच्यावेळी देखील श्रीराम यांच्या घोषणेचा उल्लेख हटवण्यास सांगितला आहे. तसेच चित्रपटाच्या प्रास्ताविकातही काही बदल सुचवण्यात आले असून प्रेक्षकांना ते व्यवस्थित वाचता यावे यासाठी त्याची लांबी वाढवण्याचेही आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.

हेही वाचा : कार्तिक आर्यनने नाकारलेल्या पान मसाल्याच्या जाहिरातीत आता अक्षय कुमार झळकणार, स्वीकारली १५ कोटींची ऑफर

अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. रामायणापासून प्रेरित होऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. अक्षय कुमारबरोबरच अभिनेत्री नुसरत भरुचाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

Story img Loader