बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट चांगली कमाई करत आहे. बहुतांश चित्रपट समीक्षकांनी सुद्धा कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र, दुसरीकडे सेन्सॉरने चित्रपटात काही बदल सुचवले आहेत.

हेही वाचा : छोट्या पडद्यावर उलगडणार सिंधुताईं सपकाळ यांचा जीवनपट; किरण माने दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, म्हणाले…

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
vidya balan reveals kartik aaryan love life
कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) अर्थात ​​सेन्सॉर बोर्डाने ‘सत्यप्रेम की कथा’च्या निर्मात्यांना चित्रपटात एकूण सात बदल करण्यास सांगितले आहेत. यामध्ये ‘घपा-घप’ या शब्दाचाही समावेश आहे. सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना हा शब्द म्यूट करण्यास सांगितले असून सर्वप्रथम संजय दत्तच्या ‘संजू’ बायोपिक सिनेमात ‘घपा-घप’ शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला होता. त्यामुळे सध्या नेटकरी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. “पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘संजू’ चित्रपटात जो शब्द सेन्सॉर बोर्डाने ठेवला होता, तो ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटातून का वगळला जातोय?” असा प्रश्न काही युजर्सनी उपस्थित केला आहे. परंतु, नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटातून सुद्धा सेन्सॉर बोर्डाने ‘घपा-घप’ संवाद हटवला होता.

हेही वाचा : “ओंक्या तू गद्दार आहेस”, ओंकार भोजनेच्या नाराज चाहत्याला दिले नम्रता संभेरावने उत्तर; म्हणाली, “त्याच्या…”

सेन्सॉर बोर्डाने ‘गुज्जु पटाका’ या गाण्यातील चेलियां हा शब्द हटवून त्याऐवजी ‘राधे की सहेलियां’ आणि ‘एक शॉट’ऐवजी ‘एक बार’ असे शब्द वापरावे असे निर्मात्यांना सुचवले आहे. तसेच ‘डर्टी माइंड’ हा शब्द चित्रपटात म्यूट करण्यात आला आहे. याशिवाय चित्रपटातून ‘फिनाइल’चे लेबल काढून टाकावे आणि शेवटी दिलेल्या बलात्काराच्या आकड्यांचा पुरावा सादर करण्यास सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना सांगितले होते. नमूद केलेल्या या बदलांनंतर ‘सत्यप्रेम की कथा’ला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात आले.

हेही वाचा : “तुझं घर स्वर्गासारखं आणि बायको…” सिद्धार्थ चांदेकरच्या लंडनमधील व्हिडीओवर मिताली मयेकरने केली भन्नाट कमेंट

दरम्यान, ‘भूल भुलैया २’ सुपरहिट झाल्यानंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या जोडीला पुन्हा एकदा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई केली होती. ‘लव आज कल’ आणि ‘भूल भुलैया २’ नंतर कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’हा तिसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.