अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’च्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे, पण तरी या चित्रपटामुळे निर्माण झालेला वाद काहीं मिटायचं नाव घेत नाहीये. नुकतंच या चित्रपटाच्या सेन्सॉर सर्टिफिकेटबद्दल चर्चा सुरू होती. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला २० कट सुचवल्याचं स्पष्ट केलं होतं. याबरोबरच चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळणार असल्याचीही चर्चा होती. परंतु CBFC च्या सदस्यांना चित्रपट पसंत पडला आहे. चित्रपटाच्या कथानकात हस्तमैथुनाच्या मुद्द्यावरही भाष्य करण्यात आली आहे.

हस्तमैथुन आणि लैंगिक शिक्षण याचा भगवान शंकराशी जोडलेला संबंध यावर प्रेक्षक कसे व्यक्त होतील याबद्दल सेन्सॉर बोर्डाचे सदस्य थोडे साशंक आहेत. यामुळेच आता CBFC ने चित्रपटाच्या निर्मात्यांना अक्षय कुमारची भूमिका बदलण्याचं सुचवलं आहे. ‘कोईमोई’च्या रीपोर्टनुसार अक्षय कुमार चित्रपटात शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
madhuri dixit husband dr shriram nene asked to pose solo at event
मिस्टर अँड मिसेस नेनेंचा डॅशिंग लूक! माधुरी दीक्षितसाठी पतीने केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
Outhouse marathi Movies Acting Movies
सहज अभिनयाची पर्वणी
Marathi actor subodh bhave talks about marriage
“लग्नसंस्थेत मुलीच्या त्यागाची गोष्ट मोठी, मुलांना…”, सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “लग्न ही कायमच ज्वलंत समस्या…”
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Amit Shah Controversy
“अमित शाहांनी राजीनामा द्यावा”, डॉ. आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यानंतर खरगेंची मागणी; काँग्रेसचं संसदेबाहेर आंदोलन; मोदींकडून बचाव
pataal lok seson 2 new promo
Video : “मौसम बदलने वाला है…”; ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला प्रेक्षकांच्या भेटीला, हाथीराम चौधरीच्या मानेवरील ‘ती’ तारीख पाहून नेटकरी म्हणाले…

आणखी वाचा : “हा चित्रपट करण जोहरचा…” ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’बद्दल अनुराग कश्यपची पोस्ट चर्चेत

यामुळे प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याने अक्षय कुमारचं पात्र हे भगवान शंकर म्हणून न दाखवता ‘शंकराचा दूत’ म्हणून दाखवण्याचं CBFC ने सुचवलं आहे. याबरोबरच काही मीडिया रीपोर्टनुसार चित्रपटातील अक्षय कुमारचे काही संवाद आणि सीन्सही हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

इतकंच नव्हे तर ‘ओह माय गॉड २’ हा ठरलेल्या दिवशी म्हणजे ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही अशीही चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. निर्मात्यांनी मात्र यावार अद्याप भाष्य केलेलं नाही. त्यामुळे ठरलेल्या दिवशीच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार अशी शक्यता आहे. ११ ऑगस्टला या चित्रपटाबरोबर सनी देओलचा ‘गदर २’सुद्धा प्रदर्शित होणार आहे. ‘ओह माय गॉड २’मध्ये अक्षय कुमारसह पंकज त्रिपाठी, यामी गौतम, अरुण गोविल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader