Manmohan Singh Passed Away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (२६ डिसेंबर रोजी) निधन झाले. त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांबरोबरच बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. रितेश देशमुख, मनोज बाजपेयी, दिलजीत दोसांझसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुख यांचे मनमोहन सिंग यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, “आज आम्ही भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावले आहेत. भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारे. ते प्रतिष्ठा आणि नम्रता याचं उत्तम उदाहरण होते. आम्ही कायम त्यांचे ऋणी राहू. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. धन्यवाद श्री मनमोहन सिंग जी.”

हेही वाचा – Video: आपल्या शेवटच्या अधिवेशनात व्हीलचेअरवरून आले होते मनमोहन सिंग, पंतप्रधान मोदींनीही काढले होते गौरवोद्गार!

हेही वाचा –

कपिल शर्माने मनमोहन सिंग यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट करून लिहिलं, “भारताने आज आपला एक उत्कृष्ट नेता गमावला आहे. ते भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि विनम्रतेचे प्रतीक होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रगती आणि आशेचा वारसा मागे सोडला आहे. त्यांच्या सुजाणतेपणा, समर्पण आणि दूरदृष्टीने आपल्या देशाचा कायापालट झाला. डॉ. सिंग तुमचे योगदान कधीही विसरता येणार नाही.”

“आपल्या माजी पंतप्रधानांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. आपल्या देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील,” अशी पोस्ट मनोज बाजपेयींनी केली.

Dr. Manmohan Singh Death: मनमोहन सिंग म्हणाले होते, “…तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ”!

दिलजीत दोसांझने वाहेगुरू असं लिहून मनमोहन सिंग यांचा फोटो शेअर केला.

diljit dosanjh manmohan singh
दिलजीत दोसांझची पोस्ट

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दूरदर्शी नेते होते, त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट केला. त्यांचा सूज्ञपणा आणि योगदान कायम स्मरणात राहील, अशी पोस्ट दिशा पटानीने केली आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भारतासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, अशी पोस्ट संजय दत्तने केली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी व तीन मुली आहेत. उपिंदर सिंग, दमन सिंग आणि अमृत सिंग अशी त्यांची नावं आहेत. मनमोहन सिंग यांच्यावर आज शासकीय इतमामात संस्कार केले जाणार आहेत.