२०२४ हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी करोनानंतरच्या काही वर्षांपेक्षा चांगलं राहिलं. या वर्षभरात अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली; दुसरीकडे काही चित्रपटांचं बजेट जास्त असूनही ते फ्लॉप ठरले. एका सुपरस्टारने प्रचंड पैसे खर्च करून तयार केलेला एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. तर या सुपरस्टारच्या पत्नीने मात्र ब्लॉकबस्टर सिनेमा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दाक्षिणात्य अभिनेत्रीने २०२४ मध्ये एक सुपरहिट चित्रपट दिला, तर तिच्या पतीच्या महागड्या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षक मिळाले नाही. कमाई तर सोडाच, हा चित्रपट निर्मिती खर्चही वसूल करू शकला नाही. ज्या सेलिब्रिटी जोडप्याबद्दल आम्ही बोलतोय, ते म्हणजे अभिनेत्री ज्योतिका आणि सूर्या होय.

हेही वाचा – Video: लग्नाआधीच प्रेग्नेन्सीमुळे राहिली चर्चेत, ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई? ‘तो’ फोटो व्हायरल

ज्योतिकासाठी २०२४ हे वर्ष खूप खास राहिलं. तिचा ‘शैतान’ सिनेमा मार्च महिन्यात रिलीज झाला होता. हा भयपट होता. या चित्रपटातून तिने हिंदी सिनेविश्वात पुनरागमन केलं. या चित्रपटात ज्योतिकाने अभिनेता अजय देवगणच्या पत्नीची भूमिका केली होती. ‘शैतान’चे दिग्दर्शन विकास बहलने केलं होतं. या चित्रपटात जानकी बोडीवाला महत्त्वाच्या भूमिकेत होती. तर यामध्ये आर माधवन खलनायकाच्या भूमिकेत होता. या चित्रपटाची कथा लोकांना फार आवडली आणि ‘शैतान’ ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. हा गुजराती चित्रपटाचा रिमेक होता. याव्यतिरिक्त ज्योतिका ‘श्रीकांत’ सिनेमात झळकली होती, त्यानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

अभिनेता सूर्या व त्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – ‘सैराट’ फेम तानाजी गाळगुंडेच्या गर्लफ्रेंडने दिली प्रेमाची कबुली? अभिनेत्याबरोबरचा ‘तो’ फोटो पोस्ट करून लिहिलं….

‘शैतान’ चे बजेट व कलेक्शन

आयएमडीबीच्या वृत्तानुसार, ज्योतिका व अजय देवगणच्या ‘शैतान’ सिनेमाच्या निर्मितीसाठी तब्बल ९५ कोटी रुपयांचा खर्च निर्मात्यांनी केला होता. या चित्रपटाने देशभरात १७६.२ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर जगभरात २१३.८ कोटी रुपये कमावले.

सूर्याचा चित्रपट कोणता?

ज्योतिकाचा पती व अभिनेता सूर्याचा फ्लॉप ठरलेला चित्रपट म्हणजे ‘कंगुवा’ होय. हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात रिलीज झाला होता. यात सूर्या मूख्य भूमिकेत होता. यामध्ये बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत होता. सूर्या व बॉबी यांच्या सिनेमातील लूकची प्रचंड चर्चा झाली होती.

हेही वाचा – ९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ चित्रपट?

‘कंगुवा’चे बजेट व कलेक्शन

सूर्याच्या ‘कंगुवा’साठी निर्मात्यांनी खूप पैसा खर्च केला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हा चित्रपट तब्बल ३५० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी त्याची खूप चर्चा होती, मात्र सिनेमागृहांमध्ये रिलीज झाल्यावर त्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आयएमडीबीच्या वृत्तानुसार, सूर्याचा चित्रपट ‘कंगुवा’ने भारतात ८१.४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर, जगभरात या चित्रपटाने १०५.२ कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट बजेटच्या निम्मीही कमाई करू शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrity couple jyothika surya movies performance in 2024 kanguva flop and in shaitaan blockbuster hrc