परिणीती चोप्रा आणि राघव सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. मंगळवारी दोघेही मुंबई आणि नंतर दिल्ली विमानतळावर स्पॉट झाले. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही १३ मे रोजी दिल्लीत साखरपुडा करणार आहेत. आता परिणीतीच्या एंगेजमेंट आउटफिटची माहिती समोर आली आहे. परिणीती तिच्या आयुष्यातील या खास प्रसंगी सेलेब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राचा डिझायनर लेहेंगा घालणार आहे. आता तिच्या साखरपुड्याच्या आउटफिटबद्दल काही बातम्या समोर आल्या आहेत.
हेही वाचा- ‘रामयणा’वर बनलेला पहिला चित्रपट; ज्यात खुद्द श्रीराम यांनीच साकारली होती सीतेची भूमिका
परिणीती आणि राघवच्या लग्नासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, परिणीतीच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला आहे की, या खास प्रसंगी हे दोघेही मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला पोशाख घालणार आहे. मंगळवारी दिल्लीला जाण्यापूर्वी ‘परी’ मनीष मल्होत्राच्या घराबाहेर स्पॉट झाली होती. तेव्हापासून आपल्या साखरपुड्यात परिणीती मनीषने डिझाइन केलेले कपडे घालणार असल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा- “लग्नाला बोलवणार का?” पापाराझींच्या प्रश्नावर राघव-परिणीती म्हणाले…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मनीष मल्होत्राच्या स्टुडिओत आणि त्यांच्या घरी अनेकदा भेट दिलेल्या परिणीतीने या खास प्रसंगासाठी खास डिझाइन तयार केले आहे. कारण परिणीतीला हेवी वर्क फारसे आवडत नाही. तिला कमी कामात छान दिसायचे आहे.
हेही वाचा- पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाल्यानंतर मनोज बाजपेयींची झाली होती ‘अशी’ अवस्था, म्हणाले, “लोक माझ्याकडून…”
परिणीती आणि राघव सलग दोन दिवस मुंबईत लंच आणि डिनर डेटवर स्पॉट झाले होते. यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले. अलीकडेच, परिणीती आणि राघव दोघांनी क्रिकेट स्टेडियममध्ये जाऊन आयपीएल सामना बघतिला होता. दोघे ऑक्टोबरमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.