आज नॉन एसी डबल डेकर बसचा मुंबईच्या रस्त्यांवर धावण्याचा अखेरचा दिवस आहे. तब्बल ८६ वर्षे मुंबईकरांच्या प्रवास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या नॉन एसी बसेस आता मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नाही. त्यांची जागा आता एसी बसेसने घेतली आहे. आज या बसेसचा अखेरचा दिवस असल्याने त्यांना सजवण्यात आलं आहे. या सजलेल्या बसेसचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Mumbai Double Decker Bus : डबलडेकर बस, मुंबईच्या राजेशाही रसरशीत सफरीचा शेवट

humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
Anupam Kher still lives in rented house
४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”

एका सजवलेल्या डबलडेकर बसचा व्हिडीओ विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीही कमेंट्स करत आहेत. मिका सिंगने या बसबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. तर भारती सिंगनेही कमेंट केली आहे.

‘माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत’, असं मिका सिंगने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं आहे. तर ‘बस बंद करू नका, मी अजुन बसले नाहीये’, अशी कमेंट कॉमेडियन भारतील सिंगने केली आहे. ‘इतिहासात जमा’ अशी कमेंट अभिनेत्री अभिज्ञा भावेने केली आहे.

Double decker Bus comments
भारती सिंग व मिका सिंगच्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)
abhidnya bhave
अभिज्ञा भावेची कमेंट (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, ‘मुंबईकरांसाठी ही बस नाही तर भावना आहे’, ‘या बसबरोबर लहानपणीच्या खूप आठवणी आहेत’, ‘आज खूप वाईट वाटतंय’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर ज्यांना या बसमध्ये बसण्याचा अनुभव नाही, त्यांनी आपले स्वप्न अपूर्ण राहिल्याचं कमेंट करून म्हटलं आहे.