बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलत असते तसेच सोशल मीडियावर ती बेधडकपणे तिची मतं मांडत असते. मध्यंतरी सेलिना आपल्यावर वैयक्तिक टिप्पणी करणाऱ्या एका ट्विटर युझरवर चांगलीच भडकली होती. सोशल मीडियावर उमेर संधू नावाचे एक स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आहे. ते स्वत:ला चित्रपट पत्रकार म्हणवूनही घेतात. त्यांनी अभिनेत्री सेलिना जेटलीबद्दल केलेले घृणास्पद ट्वीट चांगलेच चर्चेत होते.
उमेर संधू यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलेलं की, “सेलिना जेटली ही एकमेव अभिनेत्री आहे जीने बॉलिवूडमधील पितापुत्र जोडी फिरोज खान आणि फरदीन खान या दोघांबरोबर शारीरिक संबंध ठेवले आहेत.” आता हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. त्यावेळी उमेर यांच्या ट्वीटवर सेलिनाने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती. याबरोबरच तिने याची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडेही केली होती. त्यांनीच या प्रकरणाची दखल परराष्ट्र मंत्रालयाने घ्यावी अशी विनंती केली होती.
आणखी वाचा : कियारा अडवाणीच्या हस्तमैथुनाच्या सीनमागे लतादीदींच्या आवाजातील गाणं ऐकून मंगेशकर कुटुंबीय झालेले नाराज
या संपूर्ण प्रकरणावर सेलिनाने पुन्हा ट्वीट करत माहिती दिली आहे. ती आपल्या ट्वीटमध्ये म्हणते, ““काही महिन्यांपूर्वी, स्वत:ला हिंदी चित्रपट समीक्षक म्हणवणारे पाकिस्तानी पत्रकार उमेर संधू यांनी ट्विटरवर माझ्याविरुद्ध खोट्या आणि भयानक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी माझे गुरु फिरोज खान आणि त्यांचा मुलगा फरदीन खान यांच्याबरोबर असलेल्या माझ्या नातेसंबंधांवर अपमानकारक भाष्य केलं होतं.”
पुढे सेलिना म्हणाली, “तो गुन्हेगार सतत त्याचे ऑनलाइन लोकेशन बदलत असतो पण तो सध्या पाकिस्तानात कुठेतरी लपून बसला आहे. तिथूनही तो माझ्याबद्दल भाष्य करतोय. त्यानंतर मी ही बाब राष्ट्रीय महिला आयोगासमोर मांडली. हे प्रकरण गांभीर्याने घेत त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले. यावर लवकरात लवकर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले आहे.” यामुळे आता हे प्रकरण पाकिस्तानच्या हाय कमिशनपर्यंत पोहोचलं असून यावर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला जात आहे.
आपल्या ट्वीटमध्ये सेलिना पुढे म्हणते, ““हा लढा फक्त माझ्या चारित्र्यासाठी नाही तर माझ्या सचोटीसाठी, माझ्या मातृत्वासाठी, माझे कुटुंब आणि मुख्य म्हणजे माझे गुरू आणि गॉडफादर श्री. फिरोज खान यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. जे आता हयात नाहीत. ते माझे गुरू, मित्र, मार्गदर्शक होते. त्यांच्याकडून मला खूप प्रेम, आदर आणि मार्गदर्शन मिळाले याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मी एका सैनिकाची मुलगी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईन. त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी माझी पाकिस्तानातही जायची तयारी आहे.”
सेलिना जेटलीने २००१ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्यानंतर २००३ मध्ये आलेल्या ‘जनशीन’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात फरदीन खान मुख्य भूमिकेत होता आणि फिरोज खान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सध्या सेलिना बऱ्याच दिवसांपासून चित्रपट क्षेत्रापासून लांब आहे.