बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलत असते तसेच सोशल मीडियावर ती बेधडकपणे तिची मतं मांडत असते. आता सेलिना जेटलीने सोशल मीडियावर युझरची चांगलीच शाळा घेतली आहे. सेलिनावर वैयक्तिक टिप्पणी करणाऱ्या एका ट्विटर युझरवर ती चांगलीच भडकली आहे.
सोशल मीडियावर उमेर संधू नावाचे एक स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आहे. ते स्वत:ला चित्रपट पत्रकार म्हणवूनही घेतात. त्यांनी अभिनेत्री सेलिना जेटलीबद्दल केलेले घृणास्पद ट्वीट चर्चेत आहे आणि याच ट्विटवर उत्तर देत सेलिना जेटलीने ट्विटरला टॅग करत याची दखल घ्यायची विनंती केली आहे. उमेर संधू यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं की, “सेलिना जेटली ही एकमेव अभिनेत्री आहे जीने बॉलिवूडमधील पितापुत्र जोडी फिरोज खान आणि फरदीन खान या दोघांबरोबर शारीरिक संबंध ठेवले आहेत.”
आणखी वाचा : “पापाराझींना फटकारणाऱ्या जया बच्चन…” कोंकणा सेन शर्माचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
उमेर यांच्या या ट्वीटला काहीच आगा पिछा नसल्याने याची आणखी चर्चा होत आहे. बऱ्याच लोकांनी यावरून त्यांची निंदा केली आहे. खुद्द सेलिनानेही हे ट्विट कोट करत लिहिले की, “श्रीयुत संधू अशा प्रकारची पोस्ट करून तुम्हाला तुमच्या पुरुष असण्यावर अधिक अभिमान वाटत असेल. तुमच्या नपुंसकतेवरचा उपाय तुम्हाला मिळाला आहे, पण तुमचा हा आजार इतरही डॉक्टरच्या उपचारानेही बरा होऊ शकतो. कधीतरी नक्कीच प्रयत्न करून बघा. ट्विटरने कृपया यांच्याविरोधात त्वरित कारवाई करावी.”
आणखी वाचा : नागा चैतन्यबरोबरचं नातं अन् घटस्फोटाबद्दल समांथा रूथ प्रभूने सोडलं मौन; म्हणाली “मला काहीही विसरायचं…”
लोक सेलिनाला या व्यक्तीवर मानहानीचा खटला दाखल करण्याचा सल्लाही देत आहेत. कारण ही व्यक्ती कायमच अशा वक्तव्यामुळे चर्चेत असते असं काही लोकांचं म्हणणं आहे. सेलिना जेटलीने २००१ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. २००३ मध्ये आलेल्या ‘जनाशीन’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन फिरोज खान यांनी केले होते. यात फरदीन खान आणि सेलिना प्रमुख भूमिकेत होते. सेलिनाने नंतर ‘नो एंट्री’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘हे बेबी’ आणि ‘गोलमाल रिटर्न्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.