अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून नवा वाद रंगला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घाललेल्या भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. याविरोधात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या गाण्यात आणि चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष यांनी भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’चा ट्रेलर लीक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
‘पठाण’ चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. या चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी चित्रपट निर्मात्यांना दिली आहे. ते नुकतेच म्हणाले आहेत की “या प्रकरणावर समतोल साधणं आमच्यासाठी एक कठीण काम आहे,” ANI ने ट्वीट करत माहिती दिली.
हेही वाचा – ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ चित्रपटातून प्रसिद्ध दिग्दर्शकाची लेक करणार पदार्पण; लूक व्हायरल
याआधी त्यांनी एबीपी न्यूज’ला माहिती दिली आहे, ते असं म्हणाले होते “हा चित्रपट नुकताच सीबीएफसी समितीकडे प्रमाणपत्रासाठी दाखवण्यात आला. यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याचे परीक्षण करण्यात आले. यावेळी परीक्षक समितीने निर्मात्यांना गाण्यांसह चित्रपटात काही बदल करण्याचे सुचवले आहे. हे सुचवलेले बदल अंमलात कसे आणावे, यासाठी मार्गदर्शनही केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची सुधारित आवृत्ती सेन्सॉरकडे सादर करावी”, असे आदेशही सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.
दरम्यान शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.