बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले बरेच दिवस रणबीरचे चाहते आणि चित्रपटप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाची दोन लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने ७ कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे. ट्रेलरवरूनच चित्रपटात भरपुर रक्तपात, हिंसा आणि खिळवून ठेवणारे अॅक्शन सीन्स असणार हे स्पष्ट झालं. इतकंच नव्हे तर चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळाल्याचंही दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सांगितलं.

आणखी वाचा : “तिने दिलेला संदेश…” राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात लग्नातील साडी नेसणाऱ्या आलिया भट्टचं सुहाना खानने केलं कौतुक

आता याला सेन्सॉरने ‘ए’ सर्टिफिकेट दिलेलं असूनसुद्धा या चित्रपटातील ५ ठिकाणी सेन्सॉरने कात्री चालवली आहे. याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत. चित्रपटाच्या १ तास ३१ मिनिटाला येणाऱ्या संवादातील ‘ब्लॅक’ हा शब्द हटवण्यात आला आहे. तर पुढील एका संवादातील ‘कॉस्च्युम’ शब्दाऐवजी ‘वस्त्र’ हा शब्द वापरण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच सबटायटलमधील ‘You change pads four times a month’ हे वाक्य काढून टाकण्यास सांगितले आहे. शिवाय चित्रपटात जिथे शिवीगाळ करण्यात आला आहे तिथेही काही बदल सुचवण्यात आले आहेत.

या चार बदलांबरोबरच आणखी एक पाचवा अन् मोठा बदल करण्यात आला आहे. रणबीर आणि रश्मिका यांच्यात चित्रित केलेल्या एका इंटीमेट सीनचा एक क्लोज-अप शॉट काढण्यात आला आहे. ए सर्टिफिकेट मिळूनसुद्धा सेन्सॉरने या गोष्टी बदलल्याचं संदीप यांना खटकलं आहे. त्यांच्या आणि रणबीरच्या करिअरमधील हा सर्वात हिंस्त्र असा चित्रपट आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रानुसार या चित्रपटाची लांबी ३ तास २३ मिनिटे २९ सेकंद अशी आहे. यात रणबीरसह अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, शक्ति कपूर, प्रेम चोप्रा, तृप्ति डिमरी, सुरेश ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Censor board suggest five changes in animal even after giving a certificate avn