Kangana Ranaut Emergency Movies: कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला रिलीज डेट मिळत नव्हती. अखेर ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला आहे, त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दृष्ये कापण्याची सूचना चित्रपटाच्या टीमला केली आहे, अशी माहिती सेन्सॉर बोर्डाने आज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित केला जाईल, त्याबाबत माहिती समोर आलेली नाही.
झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्या याचिकेवर सेन्सॉर बोर्डाने आपली बाजू मांडली. सेन्सॉर बोर्ड बेकायदेशीर आणि मनमानी करून या चित्रपटाला प्रमाणपत्र देत नसल्याचं याचिकेत म्हटलं होतं. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने काही दृष्ये कापण्याच्या सूचना दिल्या आहेत, ते बदल करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी याचिकाकर्त्या झी एंटरटेनमेंटच्या वकिलाने वेळ मागितला. त्यानुसार आता खंडपीठाने पुढील सुनावणी सोमवारी (३० सप्टेंबर रोजी) ठेवली आहे.
ब्रिटनने भारतात चित्रीत केलेला अन् हिंदी कलाकारांची मांदियाळी असलेला चित्रपट पाठवला ऑस्करला
१९ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने बोर्डाला चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय २५ सप्टेंबरपर्यंत घेण्यास सांगितलं होतं. चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी वेळ लावणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.
“…अन् आमिर खडकामागे जाऊन रडू लागला”; ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा, म्हणाली, “मी अक्षयबद्दल…”
दरम्यान, कंगना रणौतचा हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, पण ४ सप्टेंबरला उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की काही शीख गटांच्या याचिकेवर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ते या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला देऊ शकत नाही. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात शिखांचा इतिहास चुकीचा दाखवला आहे, असे म्हणत कंगना रणौत आणि तिच्या सह-निर्मात्यांना शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने कायदेशीर नोटीस पाठवली होती.