चंद्रचूड सिंग हा ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. त्यावेळी बऱ्याच मोठमोठ्या चित्रपटांशी तो जोडलेला होता, पण फारकाळ त्याला हे स्टारडम टिकवता न आल्याने कालांतराने या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. २०२० मध्ये त्याने ‘आर्या’ या सुश्मिता सेनच्या वेबसीरिजच्या माध्यमातून पुनरागमन केले. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘कठपुतली’मध्येही दिसला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या चंद्रचूड सिंह पुन्हा एकदा चर्चेत आहे. एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर चंद्रचूड सिंगने सलमान खान खोटारडा असल्याचं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मधील एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान ‘कुछ कुछ होता है’मधील त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना दिसत आहे. याआधी या भूमिकेसाठी सैफ अली खान आणि चंद्रचूड सिंग यांना विचारण्यात आलं होतं. पण त्यांनी नकार दिल्याने अखेर सलमान खानकडे हे पात्र आलं आणि त्याने यासाठी होकार दिला.

आणखी वाचा : भोपाळ गॅस दुर्घटनेवर बेतलेल्या ‘द रेल्वे मेन’ सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित; आर. माधवन, केके मेनन मुख्य भूमिकेत

याबद्दल त्या व्हिडीओमध्ये सलमान म्हणाला, “चित्रपटात शाहरुख खानला कास्ट करणं अवघड नव्हतं, पण त्यावेळी अमनसाठी कलाकार शोधणं तुझ्यासाठी अवघड होतं, कारण सैफ आणि चंद्रचूड दोघेही त्यावेळी काहीच करत नव्हते. तरीही त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला. त्यानंतर मी ही भूमिका केली पण तरी आजवर तू माझ्याबरोबर पुन्हा काम केलेलं नाहीस.”

या व्हिडीओवर चंद्रचूड सिंगने कॉमेंट केल्याचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात त्याने सलमान खोटारडा असल्याचं लिहिलं आहे. यावेळी चाहत्यांना उत्तर देताना चंद्रचूडने लिहिलं, “त्यावेळी माझ्याकडे ‘जोश’, ‘क्या केहना’, ‘सिलसिला है प्यार का’सारखे चित्रपट होते, त्यामुळे माझ्याकडे ही भूमिका करण्यासाठी वेळ नव्हता म्हणून मी नकार दिलेला. मी स्वखुशीने ती भूमिका नाकारली होती.” सोशल मीडियावर हा स्क्रीनशॉट व्हायरल होत असल्याने सलमानचं खोटं लोकांसमोर उघड झालं आहे.

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

काहीच दिवसांपूर्वी ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाने २५ वर्षं पूर्ण केली. त्यानिमित्त करण जोहर, राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांनी मुंबईमधील एका चित्रपटगृहात या चित्रपटाचे खास शोज आयोजित केले होते ज्यासाठी प्रेक्षकांनी तूफान गर्दी केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrachur singh calls salman khan liar says he rejected kuch kuch hota hai avn