जुलै महिन्यात चांद्रयान मोहीम सुरु झाली. आज २३ ऑगस्टला चांद्रयान मोहीम पूर्ण होणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान उतरणार आहे. हा इतिहास भारत घडवणार का? याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. अशात आपली हिंदी सिनेसृष्टी आणि चंद्र यांचं अत्यंत गहिरं नातं आहे. चंद्रावर लिहिलेली गाणी ही आजही लोकांच्या मनात रुंजी घालत आहेत. जाणून घेऊया अशाच काही अजरामर गाण्यांविषयी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौधवी का चांद हो..

गुरु दत्त आणि वहिदा रेहमान यांच्यावर चित्रित झालेलं गाणं चौधवी का चांद हो या आफताब हो हे आजही लोकांच्या स्मरणात आहे. चौधवी का चांद याच सिनेमात हे गाणं आहे. मोहम्मद रफी यांनी हे गाणं गायलं आहे. जे आजही लोक गुणगुणत असतात.

खोया खोया चांद

काला बाजार या सिनेमातलं खोया खोया चांद.. खुला आसमाँ हे गाणं ऐकलं की एक वेगळंच समाधान मनाला मिळतं. देव आनंद यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही चर्चेत आहे.

ये चांदसा रोशन चेहरा (काश्मीर की कली)

ये चांदसा रोशन चेहरा जुल्फो का रंग सुनहरा.. हे गाणं शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालं आहे. आजही हे गाणं लोकांच्या मनात रुंजी घालतं आहे.

मेरे सामनेवाली खिडकीमें एक चांदसा टुकडा (पडोसन)

पडोसन सिनेमातलं मेरे सामनेवाली खिडकी में इक चांदका टुकडा रहता है हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं आहे. या गाण्यात प्रेयसीला चंद्राची उपमा देण्यात आली आहे. सुनील दत्त आणि वहिदा रेहमान यांच्या या सिनेमात भूमिका आहेत.

चांद मेरा दिल (हम किसीसे कम नहीं)

ऋषी कपूर यांचा सिनेमा हम किसीसे कम नहीं.. या सिनेमात चांद मेरा दिल हे गाणं आहे. हे गाणंही त्या काळात खूप गाजलं होतं.

जुन्या काळातच चंद्रावर ही गाणी लिहिली असं नाही. चंद्राने नव्या कवींनाही भुरळ घातली आणि हिंदी सिनेसृष्टीचं जेव्हा बॉलिवूड झालं तेव्हा बॉलिवूडमध्येही चंद्रावर गाणी लिहिली गेली आहेत. ती गाणीही आजही लोकांच्या स्मरणात आहे.

गली में आज चांद निकला (जख्म)

नागार्जुन आणि पूजा भट्ट यांच्यावर चित्रित झालेलं गली में आज चांद निकला हे गाणंही अजरामर गाण्यांच्या यादीत आहे. जख्म हा सिनेमा महेश भट्ट दिग्दर्शित होता. यातलं हे गाणं आजही चर्चेत आहे.

चांद छुपा बादल मे (हम दिल दे चुके सनम)

ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यावर चित्रित झालेलं चांद छुपा बादलमे या गाण्याचीही अवीट गोडी आहे. करवा चौथ या बॉलिवूडच्या आवडत्या थीमवर हे गाणं रचण्यात आलं आहे. मनाविरुद्ध लग्न झालेल्या मुलीला तिच्या प्रियकराची आठवण येत असते आणि तेव्हा हे गाणं दाखवण्यात आलं आहे.

चांद सिफारीश (फना)

फना या सिनेमात असलेलं चांद सिफारीश जो करता हमारी.. हे गाणंही लोकांच्या ओठांवर अगदी सहज येतं. काजोल आणि आमिर खान या दोघांवर हे गाणं चित्रित झालं आहे.

चंदा रे चंदा रे कभी तो जमींपर आ.. (सपने)

सपने या सिनेमातलं चंदा रे चंदा रे कभी तो जमींपर आ बैठेंगे बाते करेंगे.. हे गाणंही त्याच्या खास म्युझिकमुळे लोकांच्या स्मरणात आहे. ए. आर. रहमानचं संगीत, काजोल आणि प्रभू देवा यांचा डान्स आणि बेधुंद करणारी रात्र हे पाहून मन मोहून जातं.

चांद तारे तोड लाऊं.. (येस बॉस)

येस बॉस सिनेमातलं चांद तारे तोड लाऊं हे शाहरुखवर चित्रित झालेलं आणि अभिजितने म्हटलेलं गाणं आजही लोकांच्या तोंडी अगदी सहज येतं.

हिंदी प्रमाणेच मराठी सिनेमांमध्येही चंद्राची उपमा देऊन गाणी लिहिलण्यात आली आहेत. उंबरठा सिनेमातलं चांद मातला हे गाणं आजही आपल्या तोंडी अगदी सहजपणे येतं. त्याचप्रमाणे तोच चंद्रमा नभात, हा चंद्र जिवाला लावी पिसे, चांदोबा चांदोबा भागलास का? ही गाणीही चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 moon landing bollywood songs on chand romantic songs scj