शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने ‘बेशरम रंग’ गाण्यात काही बदल सुचवले होते. यामध्ये गाण्याचे बोल आणि काही शॉट्सचा समावेश होता. बोर्डाने यात बदल करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, दीपिका पदुकोणची वादग्रस्त भगवी बिकिनी अजूनही अॅक्शन चित्रपटात दिसू शकते, असं दिसतंय.
भगव्या बिकिनीनंतर ‘पठाण’चं ‘बेशरम रंग’ गाणं पुन्हा वादात; Video शेअर करत पाकिस्तानी गायकाचा आरोप
‘बेशरम रंग’मधील बोल्ड दृश्यांसह १० शॉट्स बदलण्याच्या सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने दिल्या आहेत. त्यानंतर काही बदल करण्यात आले आहेत, पण दीपिकाची भगवी बिकिनी मात्र तशीच दिसू शकते, असं म्हटलं जातंय. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ‘बेशरम रंग’मध्ये दीपिकाच्या शरीराचे काही क्लोज-अप शॉट्स काढण्यात आले आहेत. यासोबतच गाण्यातील ‘बहुत तंग किया’च्या बोलांसह काही सेन्स्युस व्हिज्युअल्स देखील इतर शॉट्सने बदलले आहेत. ‘बेशरम रंग’मधून दीपिकाची साइड पोजही काढून टाकण्यात आली आहे. दीपिकाच्या वादग्रस्त भगव्या बिकिनीचे शॉट्स अजूनही गाण्यात आहेत की काढून टाकण्यात आले आहेत, याची माहिती समोर आलेली नाही.
‘पठाण’मधील १३ ठिकाणी पीएमओ बदलण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. कथेनुसार, तपास यंत्रणा ‘रॉ’ चे नाव बदलून ‘हमारे’ करण्यात आले आहे. ‘इससे सस्ती स्कॉच नहीं मिली’या डायलॉगमध्ये स्कॉचच्या जागी ‘ड्रिंक’ हा शब्द वापरण्यात आला आहे. अशोक चक्राऐवजी ‘वीर पुरस्कार’, ‘एक्स-केजीबी’ला ‘एक्स-एसबीयू’ आणि ‘मिसेस भारतमाता’ ऐवजी ‘हमारी भारतमाता’ शब्दांचा बदल करण्यात आल्याचंही म्हटलं जातंय.
Video: ‘पठाण’विरोधात आता बजरंग दल आक्रमक, शाहरुख खानचे पोस्टर्स फाडत मॉलमध्ये केली तोडफोड
चित्रपटाच्या एका सीनवर सुरू असलेल्या मजकुरात ‘ब्लॅक प्रिझन, रशिया’ बदलून ‘ब्लॅक प्रिझन’ करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. या बदलांसह सेन्सॉर बोर्डाने ‘पठाण’च्या निर्मात्यांना ‘यू/ए’ रेटिंग दिलं आहे. चित्रपटाचे किती सेकंदांचे फुटेज सेन्सॉर करण्यात आले आहे याबद्दल माहिती उघड करण्यात आलेली नाही, परंतु आता चित्रपटाचा रनटाइम १४६ मिनिटांचा म्हणजेच २ तास २६ मिनिटांचा झाला आहे, असंही त्या अहवालात म्हटलंय. चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होणार आहे.