लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तिकीट बारीवर ३३.१ कोटींचा गल्ला जमवला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र यातील कलाकारांचं मोठं कौतुक होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विकी कौशल आणि रश्मिका मंदाना या दोघांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंबर कसली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखतीही दिल्या. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या कलाकारांनी त्यांनी घेतलेली मेहनत आणि चित्रपटाशी जोडलेल्या अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर केल्या. अशात आता अभिनेत्री रश्मिका मंदानाने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. यामध्ये तिने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचे आभार मानले आहेत. तसेच अभिनेता विकी कौशलच्या कामाचे कौतुक केले आहे.

“विकी तू खरा कलाकार आहेस, शत्रू वगैरे नंतर, पण मला आशा आहे की तुला जे हवं आहे ते तुला नक्की मिळेल. किंबहुना तुला त्याहून जास्त मिळेल. कारण तू त्यासाठी पात्र आहेस.” चित्रपटाचे प्रमोशन सुरू असताना रश्मिका मंदानाच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावेळी विकीने वेळोवेळी तिला साथ दिली. त्यावर पुढे लिहित तिने विकीचे आभार मानले आहेत.

“माझा हात धरल्याबद्दल आणि प्रमोशनच्या संपूर्ण काळात मला दुखापत होऊ नये याची काळजी घेतल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. जेव्हा जेव्हा मी शूटिंग करायचे, तेव्हा तू तिथे असायचा. शूटनंतर मी तुला विचारायचे की शॉट ठीक आहे का? आणि तुला जे खरं आहे वाटतं तेच सांगायचा, त्यासाठी धन्यवाद.”

रश्मिकाने तिच्या पोस्टमध्ये दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचेही आभार व्यक्त केले. तिने लिहिलं. “लक्ष्मण सर, मला तुम्ही खूप आवडता. मी तुम्हाला हे कधीच सांगितले नाही, पण तुम्ही खरोखरच आजपर्यंत मला भेटलेल्या सर्वात सुंदर व्यक्तींपैकी एक आाहात. तुम्हाला भेटता आल्याने आणि ओळखता आल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते.”

रश्मिकाने या पोस्टमध्ये लक्ष्मण उतेकर यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्साही सांगितला आहे. तसेच चित्रपटासाठी मेहनत घेतलेल्या अन्य सर्व कलाकारांचे आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. “संपूर्ण कलाकार आणि क्रू – मी खूप भाग्यवान आणि सन्मानित आहे की मला तुमच्या सर्वांसोबत काम करायला मिळाले आणि मी खरोखरच आभारी आहे, तुम्ही सर्व जण एक रॉक स्टार आहात,” असंही रश्मिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.