Chhaava Box Office Collection Day 1 : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी दिग्दर्शित केलेला बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) व रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे या सिनेमाचीच चर्चा आहे. चित्रपटातील एका सीनमुळे वाद झाल्याने रिलीजनंतर याला कसा प्रतिसाद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा पाहून प्रेक्षक भारावले आहेत, परिणामी चित्रपटाने ग्रँड ओपनिंग केली आहे.

‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपट कसा आहे, ते सांगत आहेत. विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना यांच्यासह इतर कलाकारांचं काम जबरदस्त आहे. एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.

चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई

अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. मॅडोक फिल्म्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘छावा’ने भारतात पहिल्या दिवशी ३३.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर, जगभरात ५० कोटी रुपये कमावले आहेत. ‘ये छावा की दहाड है’ असं कॅप्शन देत निर्मात्यांनी आकडेवारी शेअर केली आहे.

‘छावा’चे बजेट किती?

Chhaava Budeget: लक्ष्मण उतेकर यांनी ४ वर्षे अभ्यास करून छत्रपती संभाजी महाराजांवरील हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनीही प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी तब्बल १३० कोटी रुपये खर्च केले आहेत. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच तो बजेटची रक्कम वसूल करेल, असं दिसत आहे.

‘छावा’मध्ये कलाकारांची मांदियाळी

‘छावा’मध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी, रोहीत पाठक या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader