Chhaava Box Office Collection Day 11 : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन ११ दिवस झाले आहे. या ११ दिवसांत चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली ते जाणून घेऊयात.
‘छावा’मध्ये विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आणि अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लक्ष्मण उतेकरांनी आवाज दिला आहे. मराठी कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट मागील ११ दिवसांपासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे.
‘छावा’चे ११ दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘छावा’ सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई – ३३.१ कोटी
‘छावा’ सिनेमाची दुसऱ्या दिवसाची कमाई – ३९.३ कोटी
‘छावा’ सिनेमाची तिसऱ्या दिवसाची कमाई – ४९.०३ कोटी
‘छावा’ सिनेमाची चौथ्या दिवसाची कमाई – २४.१ कोटी
‘छावा’ सिनेमाची पाचव्या दिवसाची कमाई – २५.७५ कोटी
‘छावा’ सिनेमाची सहाव्या दिवसाची कमाई – ३२.४ कोटी
‘छावा’ सिनेमाची सातव्या दिवसाची कमाई – २२ कोटी
‘छावा’ सिनेमाची आठव्या दिवसाची कमाई – २४.०३ कोटी
‘छावा’ सिनेमाची नवव्या दिवसाची कमाई – ४४.१ कोटी
‘छावा’ सिनेमाची १० व्या दिवसाची कमाई – ४१.१ कोटी
सॅकनिल्कने दिलेल्या प्रारंभिक आकडेवारीनुसार, ‘छावा’ सिनेमाने ११ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी ११.५० कोटी रुपये कमावले. चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३४६ कोटी रुपये झाले आहे. मॅडॉक फिल्म्सने अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.
‘छावा’ चित्रपटाची निर्मिती १३० कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे. या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत बजेटची रक्कम वसूल केली. त्यानंतर सातत्याने चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. ‘छावा’ २०२५ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. १० दिवस रोज किमान २० कोटींहून जास्त कमाई करणाऱ्या छावाने ११ व्या दिवशी पहिल्यांदाच २० कोटींपेक्षा कमी कलेक्शन केले आहे.
दरम्यान, ‘छावा’मध्ये विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर, निलकांती पाटेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे, डाएना पेंटी हे कलाकार आहेत.