Chhaava Box Office Collection Day 13 : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे. चित्रपटाच्या कमाईत १२ व्या दिवशी थोडी घसरण झाली होती, पण १३ व्या पुन्हा दिवशी मोठी वाढ झाली आहे. या चित्रपटाने महाशिवरात्रीला जबरदस्त कलेक्शन केले आहे.
‘छावा’मध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर, रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. ‘छावा’मध्ये संतोष जुवेकर, निलकांती पाटेकर, सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी हे मराठी कलाकार आहेत.
‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत, परिणामी सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे.
‘छावा’ सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘छावा’ पहिल्या दिवसाची कमाई – ३३.१ कोटी
‘छावा’ दुसऱ्या दिवसाची कमाई – ३९.३ कोटी
‘छावा’ तिसऱ्या दिवसाची कमाई – ४९.०३ कोटी
‘छावा’ चौथ्या दिवसाची कमाई – २४.१ कोटी
‘छावा’ पाचव्या दिवसाची कमाई – २५.७५ कोटी
‘छावा’ सहाव्या दिवसाची कमाई – ३२.४ कोटी
‘छावा’ सातव्या दिवसाची कमाई – २२ कोटी
‘छावा’ आठव्या दिवसाची कमाई – २४.०३ कोटी
‘छावा’ नवव्या दिवसाची कमाई – ४४.१ कोटी
‘छावा’ १० व्या दिवसाची कमाई – ४१.१ कोटी
‘छावा’ ११ व्या दिवसाची कमाई – १९.१० कोटी
‘छावा’ १२ व्या दिवसाची कमाई – १९.२३ कोटी
‘छावा’ चित्रपटाने १३ व्या दिवशी २५.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन ३९७.८६ कोटी रुपये झाले आहे. ‘छावा’ हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे, तसेच हा विकी कौशलच्या करिअरमधील सर्वाधिक कलेक्शन करणारा सिनेमा आहे.
लक्ष्मण उतेकर यांनी ४ वर्षे मेहनत घेऊन ‘छावा’ हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाने फक्त ३ दिवसांत निर्मिती खर्च वसूल केला आहे. दरम्यान, ‘छावा’ सिनेमावर कान्होजी व गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी आक्षेप घेतल्याने वाद उद्भवल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.