Chhaava Box Office Collection Day 16: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘छावा’ चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. अजूनही प्रेक्षक विकी कौशलचा ‘छावा’ बघण्यासाठी गर्दी करत आहेत. नुकताच देशांतर्गत ‘छावा’ चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा पार केला. ५०० कोटींच्या क्लबमध्ये अवघ्या काही दिवसांत ‘छावा’ची एन्ट्री होणार आहे. १६व्या दिवशी विकी कौशलच्या या बहुचर्चित चित्रपटाने किती कमाई केली? जाणून घ्या…
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ चित्रपटाने १६व्या दिवशीदेखील चांगलीच कमाई केली आहे. १६व्या दिवशी या चित्रपटाने २१ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘छावा’ चित्रपटाची देशांतर्गत कमाईचा आकडा ४३३.५० कोटी झाला आहे. आता लवकरच ‘छावा’ ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
‘छावा’ चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका छत्रपती संभाजी महाराज यांची साकारली आहे. तर रश्मिका मंदाना शंभूराजेंची पत्नी येसुबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. तर अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसंच आशुतोष राणा, दिव्या दत्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय बऱ्याच मराठी कलाकारांनी ‘छावा’ चित्रपटात काम केलं आहे.
देशांतर्गत ‘छावा’ चित्रपटाची कमाई
- पहिल्या दिवशी – ३१ कोटी
- दुसऱ्या दिवशी – ३७ कोटी
- तिसऱ्या दिवशी – ४८.५ कोटी
- चौथ्या दिवशी – २४ कोटी
- पाचव्या दिवशी – २५.२५ कोटी
- सहाव्या दिवशी – ३२ कोटी
- सातव्या दिवशी – २१.५ कोटी
- पहिल्या आठवड्यातील एकूण कमाई – २१९.२५ कोटी
- आठव्या दिवशी – २३.५ कोटी
- नवव्या दिवशी – ४४ कोटी
- दहाव्या दिवशी – ४० कोटी
- अकराव्या दिवशी – १८.५७ कोटी
- बाराव्या दिवशी – १८.५ कोटी
- तेराव्या दिवशी – २३ कोटी
- चौदाव्या दिवशी – १३.२५ कोटी
- दुसऱ्या आठवड्यातील एकूण कमाई – १८०.२५ कोटी
- पंधराव्या दिवशी – १३ कोटी
- सोळाव्या दिवशी – २१ कोटी
- आतापर्यंतची एकूण कमाई – ४३३.५० कोटी
‘छावा’ चित्रपटाने आतापर्यंत कोणत्या चित्रपटांना कमाईत मागे टाकलं
- बाहुबली: द बिगनिंग ( २०१५ ) – ४२१ कोटी
- 2.0 ( २०१८ ) – ४०७.०५ कोटी
- सालार ( २०२३ ) – ४०६.४५ कोटी
- अवतार: द वे ऑफ वॉटर ( २०२२ ) – ३९१.४ कोटी
- दंगल ( २०१६ ) – ३८७.३८ कोटी
- अव्हेंजर्स: एन्डगेम – ३७३.०५ कोटी
- जेलर – ३४८.५५ कोटी
- संजू – ३४२.५७ कोटी