Chhaava Box Office Collection Day 7 : विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शत हा चित्रपट मागच्या शुक्रवारी (१४ फेब्रुवारीला) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एका आठवड्यापासून ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. चित्रपटाने आतापर्यंत दमदार कमाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘छावा’ची क्रेझ जगभरात पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. सहाव्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने सातव्या दिवशीही जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाचे एका आठवड्याचे कलेक्शन किती झाले ते जाणून घेऊयात.

‘छावा’ची एका आठवड्याची कमाई किती?

‘छावा’ने पहिल्या दिवशी ३३.१ कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी ‘छावा’ने ३९.३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले; तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी ४९.०३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सोमवारी वीक डे असल्याने कमाई थोडी घसरली, चौथ्या दिवशी २४.१ कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटाने २५.७५ कोटी रुपये कमावले. तर सहाव्या दिवशी म्हणजेच शिवजयंतीला सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली आणि तब्बल ३२.४ कोटी रुपये कमावले. सातव्या दिवशी चित्रपटाने २२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे सात दिवसांचे भारतातील एकूण कलेक्शन २२५.६८ कोटी रुपये झाले आहे.

‘छावा’ चित्रपटाचे बजेट

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाने भारतात २०० कोटींचा टप्पा गाठला आहे. एक आठवडा उलटूनही चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘छावा’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. बजेटची रक्कम या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत वसूल केली होती.

छावा चित्रपटातील पोस्टर (सौजन्य – इन्स्टाग्राम)

‘छावा’तील कलाकार

छावा चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. संतोष जुवेकरने रायाजी हे पात्र साकारले आहे, तर विनित सिंह कवी कलश या भूमिकेत आहे. सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, आशुतोष राणा, सारंग साठ्ये, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी हे कलाकारही या चित्रपटात आहेत.