Chhaava Deleted Scene : छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसाच्या शोपासूनच चित्रपटाला तुफान गर्दी होते आहे. छावा हा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारलेला आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर लक्ष्मण उतेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. समीक्षकांनीही सिनेमाचं कौतुक केलं आहे. दरम्यान या सिनेमातला डिलीट करण्यात आलेला सीन आता व्हायरल झाला आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वाद

छावा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातल्या काही दृश्यांवरुन वाद निर्माण झाला होता. संभाजी महाराज लेझिम खेळताना दाखवण्यात आले होते. सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हा या दृश्यांवर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर हे दृष्य सिनेमातून वगळण्यात आलं. मात्र आता सोशल मीडियावर या चित्रपटातला एक डिलिट केलेला सीन व्हायरल होतो आहे. हा सीन हंबीरराव मोहिते आणि सोयराबाई यांच्यातला आहे. सोयराबाईंना राजाराम महाराजांना छत्रपती करायचं आहे. त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात. त्यावेळी हंबीरराव मोहिते त्यांना काय म्हणतात? असा तो सीन आहे. अभिनेत्री दिव्या दत्ता आणि अभिनेता आशुतोष राणा यांच्यातला हा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे या सीनमधला संवाद?

हंबीरराव मोहीते : “एक पुतना थी जिसने विषवाला दूध पिलाकर श्रीकृष्ण को मारना चहा था और एक आप हैं. उससे भी दो कदम आगे.”

सोयराबाई : ये मत भुलिये आप किससे बात कर रहें है सरलष्कर, हम आपकी बहन नहीं. स्वराज की राजमाता हैं.

हंबीरराव मोहीते : मुझे अच्छेसे याद हैं. लेकिन आप भुल रही है की आप राजमाता क्यूँ हैं, १४ वर्ष की उमरमें बडे महाराजने स्वराज का बीज बोया था इसलिये आप राजमाता हैं. बडे महाराज के पुत्र वर्तमान छत्रपतीने ९ साल की आयुमें अपने पिता के संकल्प को अपना संकल्प बना लिया था इस लिये आप राजमाता हैं. इस दख्खन का प्रत्येक मराठा होश संभालते ही स्वराज के रक्षण का संकल्प लेता है इसलिये हैं आप राजमाता. जिस स्वराज की रक्षा और निर्माण के लिये हमारे हजारो मावलोंने प्राण न्योछावर कर दिये उसका सौदा करने निकली थी आप.

सोयराबाई : सही और गलत में अंतर केवल दृष्टीकोन का है. हमने बेटा नहीं राजा पैदा किया है. उसे छत्रपती के रुपमें देखना हमारी इच्छा नहीं, जुनून हैं. उसके लिये हम कोईभी हद पार कर सकते हैं. अगर आपकी दृष्टीमें ये अपराध है तो स्मरण रहें ऐसे अपराध होते रहेंगे, सरलष्कर जाकर कह दिजिये छत्रपतीसे की सजा सुनाये उसके शासनमें रहनेंसे बेहतर हैं की हम कैद में रहे.

हंबीरराव : कैद मे तो आप है राजमाता सोयराबाई, अपने स्वार्थ, लोभ और लालच की. जय भवानी!

दिव्या दत्ताने डिलिट झालेल्या या सीनबाबत काय म्हटलं आहे?

असा हा जबरस्त संवाद असलेला हा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्री दिव्या दत्तानं नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना दिव्या दत्तानं या डिलीट करण्यात आलेल्या सीनवर भाष्य केलं आहे. दिव्या दत्ता म्हणाली की, “तो सीन सोशल मीडियावर पाहून मीसुद्धा चकीत झाले. अर्थातच तो माझ्या सर्वात आवडीच्या सीन्सपैकी एक होता. पण ठीक आहे, असं होत राहतं. ते काही माझ्या हातात नव्हतं. पण चांगली गोष्ट ही आहे की, चित्रपटाला आणि मला खूप प्रेम मिळतंय. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, तो सीन चित्रपटात असता तर मला खूप आनंद झाला असता. पण ठीक आहे, माझी काही तक्रार नाही…”

‘छावा’मध्ये छत्रपती संभाजी राजे ज्यावेळी औरंगजेबाचा मुलगा अकबरला भेटतात, त्यावेळी त्यांना सोयराबाईंच्या कटकारस्थानांबाबत माहिती मिळते. संभाजी राजांना अतीव दुःख होतं. त्यानंतर ज्यावेळी सरसेनापती हंबीरराव (सोयराबाईंचे भाऊ आणि स्वराज्याचे सरसेनापती) जाऊन सोयराबाईंची भेट घेतात. हंबीरराव सोयराबाईंना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण करून देतात आणि त्यांच्या मनात त्यांनी जी ध्येय बाळगली आहेत, त्यावर पुर्नविचार करण्याचा परखड सल्ला देतात. यादरम्यानचा दोघांमधील संवाद या व्हायरल होणाऱ्या सीनमध्ये दाखवण्यात आला आहे. हा सीन तुफान व्हायरल झाला आहे.

Story img Loader