Chhaava Movie New Release Date : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची प्रेक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते. यापूर्वी हा सिनेमा डिसेंबर महिन्यात अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ बरोबर क्लॅश होणार होता. मात्र, यानंतर ‘छावा’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला.

चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार आहे. या ‘छावा’ चित्रपटासाठी विकी दिवसरात्र मेहनत घेत होता. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळणं ही अभिनेत्यासाठी मोठी गोष्ट होती. त्यामुळे विकीच्या चाहत्यांसह प्रेक्षक या सिनेमाचा ट्रेलर केव्हा प्रदर्शित होणार याच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभाचं औचित्य साधत चित्रपटाच्या टीमने व मॅडडॉक फिल्म्सकडून ‘छावा’ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
yeh jawaani hai deewani Ranbir Deepika romantic movie collection
YJHD : ११ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाला रणबीर-दीपिकाचा रोमँटिक चित्रपट! फक्त ३ दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
chandrika new song sonu nigam sangeet manapman
सोनू निगमने मराठी गाण्याने केली नवीन वर्षाची सुरुवात, ‘संगीत मानापमान’ मध्ये गायलंय ‘चंद्रिका’ गाणं; पाहा व्हिडीओ

हेही वाचा : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रवीना टंडनने वांद्रे परिसरातील सुरक्षेवर व्यक्त केली चिंता; म्हणाली, “सेलिब्रिटींना टार्गेट…”

विकी कौशल ( Chhaava Movie ) पोस्ट शेअर करत लिहितो, “छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा १६ जानेवारी १६८१ रोजी पार पडला होता. या दिनाचं औचित्य साधत आज बरोबर ३४४ वर्षांनंतर आम्ही महाराजांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी सज्ज झालो आहोत.” छावा चित्रपटाचा ट्रेलर येत्या २२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं विकीने या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. याशिवाय अभिनेत्याने चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटची घोषणा देखील केली आहे.

बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात विकीसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अनेक संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसेल.

हेही वाचा : Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला

हेही वाचा : Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?

दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जरा हटके जरा बचके’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटानंतर विकी आणि लक्ष्मण उतेकर यांचा हा एकत्रित दुसरा चित्रपट आहे.

Story img Loader