Chhaava On 6th December : विकी कौशलच्या बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटाचा पहिला टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. ‘छावा’ चित्रपटासाठी विकी दिवसरात्र मेहनत घेत होता. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळणं ही अभिनेत्यासाठी मोठी गोष्ट होती. त्यामुळे विकीच्या चाहत्यांसह प्रेक्षक या सिनेमाच्या पहिल्या लूकची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सर्वांची प्रतीक्षा आता संपली असून नुकताच ‘छावा’ टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता विकी कौशलने उत्तम अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. विविधांगी भूमिका साकारत विकीने त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली. आता ‘छावा’च्या माध्यमातून विकी ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘छावा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ( Chhaava Teaser )

‘छावा’ चित्रपटाच्या टीझरची सुरुवात जबरदस्त संवादाने होते. यात विकी म्हणतो, “छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है, और शेर के बच्चे को छावा” यानंतर लढाई करताना विकीचा रुद्रावतार पाहायला मिळतो. चहुबाजूंनी ‘हर हर महादेव’च्या शिवगर्जना सुरू होतात. हे दृश्य पाहताना अंगावर काटा येतो. हा जबरदस्त टीझर शेअर करत विकीने कॅप्शनमध्ये “स्वराज्य व धर्माचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज…’छावा’ चित्रपटाचा टीझर नक्की बघा. हा सिनेमा येत्या ६ डिसेंबरला तुमच्या भेटीला येईल” असं म्हटलं आहे. या टीझरमध्ये विकी सर्वांचं लक्ष वेधून घेतो.

हेही वाचा : Bigg Boss Marathi मध्ये डबल एविक्शन! योगिता अन् निखिल घराबाहेर; जाताना ‘या’ दोन सदस्यांना केलं नॉमिनी, जाणून घ्या…

टीझर संपताना औरंगजेबची झलक पाहायला मिळते. अक्षय खन्ना ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.

Chhaava Teaser : छावा चित्रपट पोस्टर ( फोटो सौजन्य : विकी कौशल )

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ ( Chhaava ) हा बायोपिक चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जरा हटके जरा बचके’ या कॉमेडी चित्रपटानंतर विकी आणि लक्ष्मण उतेकर यांचा हा एकत्रित दुसरा चित्रपट आहे. याशिवाय ‘छावा’मध्ये अनेक मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळेल. तर, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका यामध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhaava movie teaser vicky kaushal look grabs attention movie release on 6th december sva 00