Chhaava Public Review : विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षीत ऐतिहासिक ‘छावा’ चित्रपट अखेर आज (१४ फेब्रुवारीला) जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘छावा’ सिनेमाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती. आधी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, पण नंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग जबरदस्त झालं होतं. आता प्रेक्षक चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.

विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, निलकांती पाटेकर, संतोष जुवेकरसह अनेक कलाकारांची या चित्रपटात मांदियाळी आहे. ‘छावा’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी एक्सवर चित्रपट कसा वाटला ते सांगितलं आहे. ‘छावा’चे पब्लिक रिव्ह्यू कसे आहेत, ते पाहुयात…

प्रेक्षकांनी सिनेमा पाहून केलेल्या पोस्ट

“छावाचा क्लायमॅक्स तुम्हाला स्तब्ध आणि अवाक करेल! या चित्रपटाची इंटेन्सिटी, भावना आणि पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स तुमच्या अंगावर शहारे आणेल! विकी कौशलने त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय या सिनेमात केला आहे. तर अक्षय खन्नाचं काम जबरदस्त आहे,” अशी पोस्ट एका युजरने केली आहे.

चित्रपटाचा फर्स्ट हाफ खूप चांगला आहे, असं एका युजरने म्हटलं आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांनी चित्रपटाला पाचपैकी ४ स्टार रेटिंग दिले आहे.