Chhatrapati Shivaji Maharaj Movie Rishab Shetty : कांतारा चित्रपटामुळे संपूर्ण देशातील घराघरात पोहोचलेला कानडी अभिनेता ऋषभ शेट्टी आता आणखी एका बिग बजेट चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरीत्रावर आधारीत पॅन इंडिया चित्रपट साकारला जात असून ऋषभ त्यामध्ये शिवरायांची भूमिका साकारत आहेत. ऋषभने स्वतःच याबाबतची माहिती दिली आहे. त्याने त्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक देखील सादर केला आहे.

या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. २१ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे. हा चित्रपट हिंदीसह विविध भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. संदीप सिंह हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar writes letter
“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Billeshwar Mahadev temple UP Unnao
Mahabharata era Shivling damaged: महाभारतकालीन शिवलिंगाची विटंबना; अटक केलेल्या आरोपीनं सांगितलं धक्कादायक कारण

हे ही वाचा >> Video: “कसे आहात पुणेकर?” दिलजीत दोसांझने कॉन्सर्टमध्ये मराठीत साधला संवाद, म्हणाला, “मुलगी शिकली…”

चित्रपटाचं पहिलं पोस्टर सादर करताना ऋषभने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की आपला सन्मान आणि विशेषाधिकार, भारतातील महान योद्धा व महान राजाची गाथा प्रस्तुत करत आहोत. ‘दी प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’. हा केवळ एक चित्रपट नाही. हा एका योद्ध्याच्या सन्मानार्थ केलेला युद्धघोष आहे. ज्याने अनेक वादळं पायदळी तुडवतं हिंदवी स्वराज्य साकारलं आणि शक्तीशाली मुघल साम्राज्याला आव्हान दिलं. ज्या राजाने आपल्याला मोठा वारसा दिला ही त्याची गोष्ट… २७ जानेवारी २०२७ रोजी जगभरात प्रदर्शित केली जाईल.

हे ही वाचा >> विक्रांत मॅसीच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्याच्या सहकलाकाराने व्यक्त केली शंका, म्हणाला “हा तर पीआर…”

आशा भोसलेंची नात ऐतिहासिक भूमिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण करणार

दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ती या ऐतिहासिक चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जनाई ही या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. जनाई ही या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. जनाई ही आशा भोसले यांचे पूत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे. जनाई सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. उत्तम गायिका असलेली जनाई आता अभिनय करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

Story img Loader