‘कान्स चित्रपट महोत्सव २०२३’ निमित्ताने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपट महोत्सवात अनुरागचा आगामी चित्रपट ‘केनडी’चं स्क्रीनिंग होणार असल्याने त्याच्या या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू होती. नुकतंच अनुरागने या चित्रपटासाठी प्रथम दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रमची निवड केल्याचा खुलासा केला होता. नंतर विक्रमकडून काहीच उत्तर न आल्याने अनुरागने दुसऱ्याला घेऊन हा चित्रपट केल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

अनुराग सध्या त्याच्या या वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आला आहे. सोशल मीडियावर अनुरागच्या या वक्तव्याची प्रचंड चर्चा होऊ लागली, यामुळे खुद्द चियान विक्रम याने या वक्तव्यावर भाष्य करत अनुरागचं पितळ उघडं पाडलं आहे. विक्रमने ट्वीट करत अनुरागच्या या वक्तव्यावर भाष्य करत तो या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर अनुरागकडून काहीच संपर्क न झाल्यामुळे हा चित्रपट करायला जमलं नसल्याचा खुलासादेखील विक्रमने केला आहे.

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”

आणखी वाचा : “तो फारच विचित्र…” चाहत्याच्या ‘त्या’ वर्तणूकीबद्दल आहाना कुमरा स्पष्टच बोलली

विक्रम आपल्या ट्वीटमध्ये लिहितो, “प्रिय अनुराग कश्यप माझ्या काही हितचिंतकांच्या कृपेमुळे मी आपलं एक वर्षापूर्वी झालेल्या संभाषणावर नजर टाकली आहे. इतर कलाकारांकडून मला असं समजलं की या चित्रपटासाठी तुम्ही मला विचारलं होतं, पण त्यावेळी माझ्याकडून तुम्हाला काहीच उत्तर आलं नाही. त्यावेळी मी स्वतः तुम्हाला फोन करून मला कोणताही इमेल मिळालं नसल्याचं सांगितलं होतं. कारण तुम्ही मला ज्या मेल आयडीवर संपर्क केला तो आता सक्रिय नाही शिवाय माझा फोन नंबरदेखील २ वर्षांपूर्वी बदलला असल्याचं सांगितलं होतं. मी तेव्हा तुम्हाला फोनवर सांगितलं की मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे कारण यात माझ्या नावाचं कनेक्शनही आहे. तरी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमचाच चियान विक्रम उर्फ केनडी.”

चियान विक्रमच्या या ट्वीटवर एक मोठं उत्तर अनुरागने दिलं असून स्वतःची चूक कबूल केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये अनुराग लिहितो, “तुमचं अगदी खरं आहे सर. मी लोकांना सांगू इच्छितो जेव्हा विक्रम यांना इतर लोकांकडून याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी थेट मला फोन केला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्यांचा व्हॉट्सअप नंबर वेगळा आहे. त्यानंतर विक्रम यांनी मला त्यांची योग्य माहिती आणि फोन नंबरही दिला. इतकंच नव्हे तर या चित्रपटासाठी ते फार उत्सुक असल्याचंही सांगितलं. पण नेमकं त्यावेळी चित्रपटाची स्क्रिप्ट लॉक झाली होती अन् चित्रीकरण एका महिन्यावर आलं होतं.”

पुढे अनुराग म्हणाला, “मी मुलाखतीमध्ये ‘केनडी’ या नावामागील चियान विक्रम यांचं कनेक्शन याबद्दल बोललो होतो, त्यामुळे कुणीही त्याचा गैरसमज करून घेऊन नये. मी आणि चियान विक्रम दोघेही जोवर एकत्र काम करत नाही तोवर आम्ही या क्षेत्रातून निवृत्ती घेणार नाही हे नक्की. त्यामुळे चिंता नसावी.” अनुरागच्या या ट्वीटमुळे तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

“अनुरागने चुकीच्या पद्धतीने ही गोष्ट सांगितल्याने लोक चियानवर टीका करत होती.”असं काहींचं म्हणणं आहे. तर एका युझरने अनुरागचं हे ट्वीट शेअर करत लिहिलं “तू प्रसिद्धीसाठी इतका हपापला आहेस यावार विश्वासच बसत नाही. असं अर्धवट गोष्ट सांगून लोकांचा गैरसमज आणखी वाढला, एवढं झाल्यावर विक्रम सर तुझ्याबरोबर कामही करणार नाहीत याचा तू विचारही केला नाही का?”

Story img Loader