बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. तिचा ‘लस्ट स्टोरीज२’ चित्रपट २९ जूनला प्रदर्शित होणार असून पुढच्या महिन्यात ‘द ट्रायल’ वेब सीरिजच्या माध्यमातून काजोल ओटीटीवर पदार्पण करणार आहे. सध्या अभिनेत्री या दोन्ही प्रोजेक्ट्सचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.

हेही वाचा : ‘दिलवाले दुल्हनिया’ ते ‘लस्ट स्टोरीज २’ काजोलने सांगितला प्रेमसंबंधातील फरक; म्हणाली, “९० च्या दशकातील प्रेमाला आता मूर्खपणा…”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

अलीकडेच काजोलने एक मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने १९९४ मध्ये रिलीज झालेल्या नरेश मल्होत्रांच्या ‘ये दिल्लगी’ चित्रपटातील ‘होठों पर बस तेरा नाम है’ या गाण्याबद्दल एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. या रोमॅंटिक गाण्याचे शूट करताना काजोल आणि सैफ एवढे हसायचे की, नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचा दोघानांही प्रचंड ओरडायच्या.

हेही वाचा : ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये आजीची भूमिका का निवडली? नीना गुप्ता कारण सांगत म्हणाल्या, “नव्या पिढीशी लैंगिक संबंधांबद्दल…”

काजोल म्हणाली, ” मला सेक्सी आणि लाज हे शब्द माहिती नाही. माझ्याकडे या दोन गोष्टी नाहीत… एक म्हणजे पडद्यावर सेक्सी दिसणे आणि लाज वाटण्याचे हावभाव करणे. शूटिंगदरम्यान, तुला लाज वाटतेय असे दाखव किंवा हावभाव कर असे कोणीही मला सांगायचे तेव्हा मी माझे डोळे फक्त खाली करायची. ‘होठों पर बस तेरा नाम है’ या रोमॅंटिक गाण्याचे शूट करताना सरोजजींना अनेकदा मला कानाखाली मारावीशी वाटली. मी आणि सैफ एवढे हसायचो की सरोजजी म्हणायच्या, तुम्ही दोघेही खूप वाईट आहात. तुम्हा दोघांना आता मी जास्त सहन नाही करणार….”

दरम्यान, ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये काजोल महत्त्वाची भूमिका साकारणार असून या चित्रपटात तिच्याशिवाय नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर, कुमुद मिश्रा, अमृता सुभाष, तिलोत्तमा आणि अगंद बेदी हे कलाकार आहेत. ‘लस्ट स्टोरीज’चा पहिला भाग २०१८ मध्ये रिलीज झाला होता.

Story img Loader