बॉलीवूड अभिनेते चंकी पांडे यांनी विविध विनोदी पात्र साकारून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. चित्रपटात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिकांची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. चंकी पांडे फक्त त्यांच्या विनोदामुळेच नाही तर त्यांच्या कपड्यांमुळेही चर्चेत असतात. बालपणीच्या अनेक फोटोंमध्ये चंकी पांडेंनी लहान मुलींचा फ्रॉक घातलेला आहे. एका मुलाखतीमध्ये आता त्यांनी यावर मोकळेपणाने भाष्य केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंकी पांडे यांनी नुकतीच ‘मॅशेबल इंडिया’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील विविध गोष्टींवर त्यांनी मत व्यक्त केलं. बालपणीचा किस्सा सांगताना ते म्हणाले, “मी ज्या रुग्णालयात जन्म घेतला, तिथे १७ मुलींचा जन्म झाला होता आणि मी एकटाच त्यात मुलगा होतो. माझ्या आई-वडिलांना फक्त मुलगी पाहिजे होती, ते मुलासाठी तयारच नव्हते. त्यांनी शॉपिंगसुद्धा सर्व मुलीसाठी लागणाऱ्या कपड्यांची केली होती, त्यामुळे माझे बालपणीचे फोटो पाहिले तर सर्व फोटोंमध्ये मला मुलींसाखं सजवण्यात आलं आहे. कपाळावर टिकली, फ्रॉक असे सर्व फोटोंमध्ये आहे.”

“त्यामुळे लहान असतानाच मला मुलींचे कपडे आवडू लागले. आजही खरेदीसाठी बाहेर गेल्यावर मी महिलांच्या सेक्शनमधून खरेदी करतो. एकदा तर मी खरेदी करताना त्यात महिलांचे आणि पुरुषांचे कपडे मिक्स होते, त्यामुळे मी त्यातील एक ड्रेस उचलला आणि विचारलं की हे कितीचं आहे. त्यावर तेथील व्यक्ती मला म्हणाले हे मुलींचे कपडे आहेत”, असं चंकी पांडे यांनी सांगितलं.

स्त्री शक्ती…

चंकी पांडे यांनी मुलाखतीमध्ये पुढे सांगितलं, “माझ्यातील कला आणि ऊर्जा ही एक स्त्री शक्ती आहे. तसेच मी देवीचा फार मोठा भक्त आहे.” त्यांनी पुढे अनन्या त्यांच्या कपाटातून स्वत:साठी काही शर्ट घेते हेदेखील सांगितलं. ते म्हणाले, “अनन्या अनेकदा माझ्या कपाटातून शर्ट घेते. ती ते वापरते नंतर पुन्हा देत नाही. काही दिवसांनी ती ते नाईट सूट म्हणून वापरते.”

चंकी पांडे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी १९८७ मध्ये आलेल्या ‘आग ही आग’ या चित्रपटातून सिनेविश्वात पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी ‘पाप की दुनिया’मध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ‘गुनाहों का फैसला’, ‘खतरों के खिलाडी’, ‘मिट्टी और सोना’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘हाउसफूल ३’, ‘हमशकल्स’, ‘सरदार’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.