Shakti Kapoor : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शो घराघरात पाहिला जातो. यामध्ये नेहमीच विविध कलाकार हजेरी लावतात आणि लोटपोट होईपर्यंत हसतात. तसेच या शोमध्ये अनेक कलाकारांचे काही रंजक किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. कधी काही कलाकार भावूक होतात, तर कधी त्यांच्या जीवनातील आतापर्यंत कुणालाही माहिती नसलेल्या काही गोष्टींचा उलगडा होतो. असंच काहीसं नवीन एपिसोडमध्येही घडलंय.

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोमध्ये नुकतीच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी शक्ती कपूर, चंकी पांडे आणि गोविंदा शोमध्ये झळकले. गप्पा गोष्टी आणि पोट दुखेपर्यंत हसणे हे सर्व काही सुरू असताना चंकी पांडे यांनी थेट शक्ती कपूर यांच्या जीवनातील एक किस्सा सांगितला आहे. शक्ती कपूर यांना सिनेविश्वात त्यांच्या भारदास्त अभिनयाने प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखलं जातं. त्यांची ही ओळख कधीही पुसली जाऊ नये म्हणून त्यांनी थेट एका कलाकाराला पैसे देऊन खलनायकाची भूमिका करण्यापासून थांबवल्याचा खुलासा चंकी पांडे यांनी केला आहे.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”

हेही वाचा : Video: “ही माझी साथी, सवंगडी…”, सई ताम्हणकरने महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील लाडक्या व्यक्तीबद्दल केला खुलासा

‘तोफा’, ‘हिरो’, ‘मवाली’, ‘मक्सद’, ‘दो दिलों की दासता’, ‘सुलतान’ या आणि अशा अनेक चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारत शक्ती कपूर यांनी आपला दबदबा वाढवला आहे. त्याकाळी त्यांना खास खलनायक म्हणूनच ओळखलं जात होतं. मात्र, या खलनायकाला हिरो म्हणून रुपेरी पडद्यावर झळकायचं होतं. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोमध्ये गप्पा सुरू असताना शक्ती कपूर यांनी त्यांच्या आयुष्यातील हिरोच्या भूमिकेशी संबंधित एक खास किस्सा सांगितला.

शक्ती कपूर म्हणाले, “हिरो बनण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. ‘जख्मी इंसान’ या चित्रपटात मी मुख्य हिरोची भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटाने दिग्दर्शक, निर्माते आणि प्रेक्षक असे सर्वांनाच जखमी केले”, असं त्यांनी विनोदी अंदाजात सांगितलं. “या चित्रपटाने विश्व रेकॉर्ड केला. चित्रपट १२ वाजता प्रदर्शित झाला, त्यानंतर १२.१५ वाजता हा चित्रपट चित्रपटगृहातून हटवण्यात आला. हे सर्व होण्याआधी हिरोची भूमिका मिळाली तेव्हा मी सर्वांना सांगितलं की, मी आता खलनायकाची भूमिका करणार नाही. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मी विचार बदलला आणि पुन्हा सर्वांना मी खलनायकाची भूमिका करण्यासाठी तयार आहे”, असं सांगितल्याचं शक्ती कपूर म्हणाले.

त्यांचा हा किस्सा ऐकून सर्व जण हसू लागले. यावर जराही वेळ वाया न घालवता चंकी पांडे यांनी आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “एक कलाकार सिनेविश्वात खलनायकाच्या भूमिकेत पदार्पण करणार होता, त्यामुळे शक्ती कपूर यांची चिंता वाढली. त्यांनी थेट त्या कलाकाराला ५० हजार रुपये दिले आणि खलनायकाची भूमिका करू नको, तुला हिरोचे अनेक रोल मिळतील असं सांगितलं. पुढे शक्ती कपूर यांचे पैसे घेऊन तो कलाकार तब्ब्ल दोन वर्षे घरातच बसून होता.” चंकी पांडे यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकूनसुद्धा शोमध्ये सर्वत्र एकच हशा पसरला. मात्र, यावर शक्ती कपूर यांनी “हे सर्व खोटं आहे”, असं दोनवेळा सांगितलं.

हेही वाचा : विक्रांत मॅसीच्या भावाने स्वीकारलाय इस्लाम, तर वडील पाळतात ‘हा’ धर्म; त्याने स्वतःच केलेला कुटुंबाबाबत खुलासा

दरम्यान, या शोमध्ये अनेक गमती-जमती झाल्या. प्रेक्षकांसह सर्वांनीच मजेशीर किश्श्यांचा आनंद घेतला. तसेच कृष्णा अभिषेक आणि गोविंदा या दोघांच्या नात्यातील भावूक क्षणही शोमध्ये पाहायला मिळाले.