जॅकी भगनानीचे वडील, रकुल प्रीत सिंग व आमदार धिरज देशमुख यांचे सासरे ज्येष्ठ चित्रपट निर्माते वाशू भगनानी यांच्या तीन चित्रपटांसाठी काम करणाऱ्या क्रू मेंबर्सची थकबाकी अजून मिळालेली नाही, असं फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) अध्यक्ष बीएन तिवारी यांनी शुक्रवारी सांगितलं. ‘मिशन रानीगंज’, ‘गणपत’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या तीन चित्रपटांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ६५ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, वाशू भगनानी यांची कंपनी पूजा एंटरटेनमेंटने दिग्दर्शक टिनू देसाई यांचे ३३.१३ लाख रुपये अजून दिलेले नाहीत. देसाई यांनी २०२३ मध्ये ‘मिशन राणीगंज’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अक्षय कुमार परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होते. ‘मिशन राणीगंज’, टायगर श्रॉफचा ‘गणपत’ आणि अक्षय कुमार- टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटांसाठी काम करणाऱ्या २५०हून अधिक कामगारांचे ३१.७८ लाख रुपये बाकी आहेत.

“गर्लफ्रेंडची जात वेगळी असल्याने आईने दिला नकार”, ‘सैराट’ फेम तानाजीचा खुलासा; म्हणाला, “जातव्यवस्था हे सर्वात मोठं…”

१९ मार्च २०२३ रोजी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनकडे (IFTDA) देसाई यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार दिग्दर्शक देसाईंनी फेब्रुवारी २०२२ ते ६ ऑक्टोबर २०२३ या काळात ‘मिशन राणीगंज’ सिनेमावर काम केलं. चित्रपट प्रदर्शनाची तारीख व करारानुसार त्यांना चार कोटी, तीन लाख ५० हजार रुपये मिळणार होते, त्यापैकी आतापर्यंत त्यांना तीन कोटी ७० लाख ३६ हजार ९२ रुपये मिळाले आहेत.

२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

“गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘मिशन राणीगंज’च्या दिग्दर्शकाने लेखी तक्रार दिली होती, त्यानुसार त्यांना वाशू भगनानी यांच्याकडून ३३.१३ लाख रुपयांची थकबाकी मिळालेली नाही. आम्ही पूजा एंटरटेनमेंटकडे पाठपुरावा करत आहोत पण त्यांनी अजूनही पैसे दिलेले नाहीत. त्यांनी जुलै अखेरपर्यंत थकबाकी देऊ असं सांगितलं आहे,” अशी माहिती बीएन तिवारी यांनी पीटीआयला दिली.

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने पूजा एंटरटेनमेंटला यासंदर्भात खूपदा पत्रव्यवहार केले, पण तरीही त्यांनी पैसे देण्यास उशीर केला. “फेब्रुवारीमध्ये त्यांनी मुलगा जॅकी भगनानीच्या लग्नाचं कारण देऊन मेलवर २० फेब्रुवारी २०२४ रोजी आयएफटीडीएला पैसे देण्यास मुदत मागितली आणि मग त्यांनी उत्तर दिलं नाही. मार्च २०२४ मध्ये FWICE ने त्यांना पत्र लिहिल्यानंतर, त्यांनी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर थकबाकी देऊ असं सांगून पेमेंट करण्यासाठी पुन्हा वेळ मागितला, मात्र तसं झालं नाही,” असं तिवारी म्हणाले.

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

“ते जे करत आहेत ते चुकीचं आहे. स्वतः ऐशोआरामात जगत आहेत आणि पैसे द्यायची वेळ येते तेव्हा ते कारणं सांगतात. त्यांच्या नुकत्याच आलेल्या ईमेलमध्ये जुलै अखेरपर्यंत थकबाकी देणार असल्याचं म्हटलं आहे. पण त्यांनी तसं न केल्यास आमचे कामगार त्यांच्या कोणत्याही चित्रपटासाठी काम करणार नाहीत,” असा स्पष्ट इशारा तिवारींनी दिला.

फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि अलाईड मजदूर युनियनच्या २०० ते २५० कामगारांना पूजा एंटरटेनमेंटकडून ३१,७८,३२७ रुपये अजून मिळालेले नाहीत, असा दावा युनियनचे नेते राकेश मौर्य यांनी केला. कामगारांना १००० रुपये ते १४०० रुपये पर डे मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.