बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सिद्धार्थ जाधव सध्या त्यांच्या ‘सर्कस’ चित्रपटामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. या दोघांमधील मैत्री तर सर्वांनाच माहीत आहे. सिद्धार्थ आणि रणवीर यांनी रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा ‘सर्कस’मध्ये एकत्र दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरू असून यादरम्यानचा सिद्धार्थ- रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रणवीर सिंगसह ‘सर्कस’ची संपूर्ण टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतीच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ट्रेलर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावेळचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण या सगळ्यात सिद्धार्थ- रणवीरच्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग मागून येऊन सिद्धार्थ जाधवला धक्का देताना दिसत आहे.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

आणखी वाचा-‘आमच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही दोघेही…’ सिद्धार्थने सांगितला रणवीर सिंगचा ‘तो’ किस्सा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव पुढे चालताना दिसत आहे. याच व्हिडीओमध्ये रणवीर सिंग त्याच्या मागून येतो. सिद्धार्थ तिथेच कोणाशीतरी बोलत असताना मागून आलेला रणवीर त्याला धक्का मारतो आणि त्यानंतर दोघंही एकमेकांशी हसत हसत गळाभेट घेताना दिसतात. अर्थात सिद्धार्थ आणि रणवीरमधील मैत्री आणि बॉन्डिंग खास असल्याने दोघंही अनेकदा एकामेकांशी अशाप्रकारे मस्ती करताना दिसतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही धम्माल कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा चित्रपट २३ डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे. ‘सर्कस’मध्ये रणवीर सिंगबरोबर जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा, विजय पाटकर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, वृजेश हिरजी, अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader