रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट अखेर काल प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणापासून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. या नव्या चित्रपटात रोहित शेट्टी काय धमाल करतोय हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर होते. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. पहिल्या दिवशी मात्र ‘सर्कस’ चित्रपटगृहात जादू करण्यात काहीसा अपयशी ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चित्रपटात रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर दीपिका पदुकोणचीही झलक या चित्रपटात पहायला मिळते. गेले अनेक दिवस या चित्रपटाची संपूर्ण टीम मिळून सर्कसचं जोरदार प्रमोशन करत होती. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा ट्रेलरला ही चांगला प्रतिसाद मिळाला होता. वरून हा चित्रपट चांगली कामगिरी करू शकतो असं सर्वांना वाटत होतं मात्र तसं झालं नाही. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळालेला दिसला.

आणखी वाचा : “अरे! हा तर…” ‘झुमे जो पठाण’ पाहून नेटकऱ्यांनी शाहरुख खानची केली थेट अभिजीत बिचुकलेशी तुलना, जाणून घ्या कारण

‘सर्कस’चे देशभरात १० हजार शोज आहेत. तसेच ३२०० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा एकंदरीत प्रतिसाद बघता हा चित्रपट पहिला दिवशी आठ ते दहा कोटी रुपयांची कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र या चित्रपटाने तेवढीही कमाई केलेली नाही. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार पहिल्या दिवशी या चित्रपटाची तीन लाख तिकीट विकली गेलेली असून या चित्रपटाने ६.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

हेही वाचा : कोणी बंगले तर काहींनी ड्युप्लेक्स…’या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी २०२२मध्ये घेतली नवीन घरं, किमती ऐकून व्हाल थक्क

‘सर्कस’ या चित्रपटाचे बजेट ७० कोटी रुपये आहे. परंतु या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई बघता हा चित्रपट या आठवड्याच्या शेवटी अधिक पैसे कमवू शकतो असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता ‘सर्कस’ पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार का आहे येत्या काही दिवसातच समोर येईल.