८० चं दशक ज्या दिग्दर्शकाने गाजवलं ते राजकुमार संतोषी लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली होती त्यामुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. तब्बल ७ वर्षांनी राजकुमार संतोषी पुन्हा दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकतंच या चित्रपटातील नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकर याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चिन्मयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली आहे. चिन्मयने या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टरवरून हा चित्रपट म्हणजे २ विचारधारांमधील युद्ध असा असणार आहे.

आणखी वाचा : अवघ्या ८ दिवसांनी आहे तुनिषा शर्माचा वाढदिवस; गेल्या वर्षीच्या जंगी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

याहून आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख. ‘गांधी गोडसे’ हा चित्रपट पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याच्या बरोबर एकदिवस आधी शाहरुख खानचा ‘पठाण’सुद्धा प्रदर्शित होणार आहे. बरेच वर्षांनी बॉक्स ऑफिसवर अशी टक्कर बघायला मिळणार आहे. ९ वर्षांनी दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करणारे संतोषी आणि ४ वर्षांचा ब्रेक घेऊन पुन्हा मोठ्या पडद्यावर येऊ पाहणारा शाहरुख अशी जबरदस्त टक्कर बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे.

दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. याआधीसुद्धा बॉक्स ऑफिसवर असे क्लॅश बऱ्याचदा अनुभवायला मिळाले आहेत, पण तेव्हा कोणत्या तरी निर्मात्याने प्रदर्शनाची तारीख बदलल्याचं आपण पाहिलं आहे. अजूनतरी राजकुमार संतोषी किंवा शाहरुख खान या दोघांकडून अशी कोणतीही बातमी समोर आली नसल्याने हे दोन चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकणार हे नक्की आहे. सध्या ‘पठाण’विरुद्ध चांगलाच रोष बघायला मिळत आहे. अशातच या दोन्ही चित्रपटांमध्ये क्लॅश होणार असेल तर नेमका कोणता चित्रपट बाजी मारून नेतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.