बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि त्यांचे करियर कायमच चर्चेचा विषय बनतो. काही अभिनेत्रींचे करियर अवघ्या एक दोन चित्रपटानंतर संपून जाते तर काही अभिनेत्री सातत्याने हिट चित्रपट देत असतात. अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या चर्चेत आहे. नुकताच तिचा कोड नेम हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. याआधी तिचे साईना, नमस्ते इंग्लंड, जबरिया जोडी या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही.

नुकतीच तिने इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने आपल्या अपयशाबद्दल सांगितले आहे, ती असं म्हणाली की ‘माझ्यासाठी माझ्या यशाचे मोजमाप म्हणजे बॉक्स ऑफिसवरची कमाई नव्हे तर प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यासाठी पुरेशा आहेत’. ती पुढे म्हणाली ‘मला आयुष्यात पहिल्यांदाच अपयश पाहावं लागलं. जागतिक स्तरावर आपण अपयश पाहतो. अपयश तुमच्या आयुष्याला शिकवून जात. मी आज आनंदी आहे ते यामुळेच म्हणून मी कोड नेमसारखा चित्रपट निवडला’.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Success Story Of Anudeep Durishetty In Marathi
Success Story Of Anudeep Durishetty : गूगलची सोडली नोकरी, UPSC परीक्षेत तीन वेळा आलं अपयश; वाचा, देशात पहिला आलेल्या अनुदीप दुरीशेट्टीची गोष्ट
Success Story Of Sandeep Jain
Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट

विश्लेषण : ज्या बॉलिवूडने दुर्लक्षित केले तिथल्याच चित्रपटांना मागे टाकणारा ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टी आहे तरी कोण?

परिणितीने आपल्या करियरची सुरवात यशराज फिल्म्समध्ये जनसंपर्क विभागातून केली आहे. ‘लेडीज वर्सेस बेहल’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. त्यानंतर ‘इशकजादे’, ‘हसी तो फसी’, ‘केसरी’, ‘शुध देशी रोमान्स’ यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून तिने काम केले आहे. ‘गोलमाल ४’ चित्रपटातून ती एक वेगळ्या भूमिकेतून दिसली होती.

परिणीती आता राजश्री प्रॉडक्शनच्या ‘उंचाई’ चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. परिणीतीच्या बरोबरीने अमिताभ बच्चन, अभिनेता बोमन इराणी, अभिनेत्री नीना गुप्ता, सारिका, डॅनी डेंग्झोपा, नफीसा अली यांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader