‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला विनोदी अभिनेता कपिल शर्मा सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘ज्विगाटो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. लवकरच त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूडमधील चित्रपटांच्या अपयशावर भाष्य केलं आहे.
गेल्या वर्षभरापासून बॉलिवूड चित्रपट फारसे चालत नाहीयेत. ठराविक चित्रपट सोडले तर अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. यावरच कपिल शर्मा आजतकशी बोलताना असं म्हणाला, काही चित्रपट चाललेत काही नाहीत. “गेल्या काही दिवसात बघितलं शाहरुख खानचा ‘पठाण’ चालला. ‘कांतारा’सुद्धा चालला मात्र आपण बघितले तर त्यांनी चित्रपटाचे प्रमोशनदेखील जास्त केले नाही. मी कोणाला ही दोष देत नाही. जस अक्षय कुमार म्हणाला, ही आमची चूक आहे आम्ही कोणाला दोष शकत नाही. हे तेच प्रेक्षक आहेत ज्यांनी आमच्यावर इतकी वर्ष प्रेम केलं आहे. जर त्यांना तुमचे काम आवडले नसेल तर तुम्ही यामागची कारण शोधली पाहिजेत.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
Oscar Awards 2023 : दीपिकाच्या ग्लॅमरस लूकची जोरदार चर्चा; आलिया भट्ट कमेंट करत म्हणाली…
कपिलने काही विनोदी चित्रपटदेखील केले आहेत. मात्र आता तो ‘ज्विगाटो चित्रपटातून एका डिलीव्हरी बॉयचे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे सगळीकडे कौतुक होत आहे. हा चित्रपट बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला होता.
कपिलच्या ‘ज्विगाटो’ चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दासने केले असून या चित्रपटात गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत. हा चित्रपट १७ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिलचे चाहतेदेखील चित्रपटाची वाट बघत आहेत.